Palghar News: जल, जंगल व जमीन तसेच विविध मूलभूत प्रश्नांवर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सोमवारी (ता. १९) चारोटी नाका ते पालघर जिल्हाधिकारी कार्यालय असा ‘लॉंग मार्च’ काढण्यात आला. मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी नाक्यावरून दुपारी दोनच्या सुमारास हा मोर्चा पालघरच्या दिशेने मार्गस्थ झाला. या मोर्चात सुमारे १५ हजारांवर शेतकरी, आदिवासी, कामगार, महिला व तरुण सहभागी झाले. .सकाळी दहापासूनच चारोटी नाका परिसरात मोर्चेकऱ्यांची मोठी गर्दी जमू लागली होती. या मोर्चासाठी तलासरी, डहाणू, विक्रमगड, जव्हार आदी तालुक्यांतून मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. दुपारी एकच्या सुमारास राष्ट्रीय नेते अशोक ढवळे, मरियम ढवळे, शेतकरी नेते अजित नवले, कॉ. किरण गहला यांच्यासह प्रमुख नेत्यांचे आगमन झाले..Farmer Long March: माकपचा विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर लाॅंग मार्च .मरियम ढवळे म्हणाल्या, ‘‘हा ‘लाँग मार्च’ आपल्या हक्कांसाठी आहे. पालघर जिल्ह्याला ‘चौथी मुंबई’ म्हणून घोषित केले जात आहे; मात्र मुंबईसारखीच येथील नागरिकांची फरफट होण्याची चिन्हे आहेत. सरकारचा डोळा येथील जमीन, बागा व नैसर्गिक संपत्तीवर असून, उद्योगपतींच्या फायद्यासाठीच हे प्रकल्प राबवले जात आहेत. या अन्यायाला आम्ही ठाम विरोध करू.’’.श्री. ढवळे म्हणाले, ‘‘आजचे हे लाल वादळ पालघरला धडकणार आहे. हा मोर्चा कोणाच्या पैशावर उभा राहिलेला नाही. अनेक प्रकल्प असूनही बेरोजगारी, वनपट्टे, रेशन, मनरेगा व जलजीवनसारख्या योजना सामान्यांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. स्मार्ट मीटरच्या नावाखाली लूट सुरू आहे. चौथी मुंबई व विमानतळाची स्वप्ने दाखवली जात आहेत. पण एसटी वेळेवर नाही, शेतीला पाणी नाही आणि वीजबिले वाढत आहेत. वाढवण बंदरामुळे हजारो शेतकरी व मच्छीमार उद्ध्वस्त होतील.’’.आमदार विनोद निकोले म्हणाले, ‘‘पालघर जिल्ह्यातील नागरिकांना आजही रेशन कार्ड, वनपट्टे, वीजबिले व पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. वाढवण बंदर, मोरबे बंदर, बुलेट ट्रेनसारख्या प्रकल्पांमुळे पर्यावरण व जनजीवनाचे मोठे नुकसान होत आहे. या अन्यायाविरोधातच जिल्हाधिकारी कार्यालयावर लाँग मोर्चा काढण्यात आला असून, मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार नाही.’’.Melghat Tribal March: शेती प्रश्नांसाठी आदिवासींची आरपारची लढाई.श्री. नवले म्हणाले, ‘‘शेतीमालाला हमीभाव नाही, योजना बंद पडल्या आहेत. विकासाच्या नावाखाली केवळ घोषणा केल्या जात आहेत. हे लाल वादळ सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवेल.’’.चारोटीहून निघालेला हा मोर्चा सुमारे ३० किलोमीटरचा प्रवास करत मनोर मार्गे मासवण येथे सायंकाळी पोहोचणार असून, तेथे रात्री मुक्काम करण्यात येणार आहे. मंगळवारी (ता. २०) सकाळी मनोर–पालघर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहोचणार आहे..प्रमुख मागण्यावनपट्ट्यांचे दावे तातडीने निकाली काढावेत, इनाम देवस्थान व गावरान जमिनी कसणाऱ्यांच्या नावावर कराव्यात, स्मार्ट मीटर योजना बंद करावी, पेसा व इतर रिक्त पदे कायमस्वरूपी भरावीत, गरजू कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ द्यावा, जलजीवन योजनेतील भ्रष्टाचार थांबवावा, धरणांचे पाणी शेतीसाठी उपलब्ध करून द्यावे, रोजगार हमीअंतर्गत हमी रोजंदारी द्यावी, प्रकल्पग्रस्तांना आधीच नुकसानभरपाई द्यावी, वाढवण बंदर व मौर्य बंदर प्रकल्प रद्द करावेत, या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.