Yavatmal News: वेकोलिच्या कोळसा वाहतुकीतून उडणाऱ्या धुळीमुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या नुकसानीची भरपाई मिळावी, यासाठी शेतकऱ्यांनी गेल्या प्रशासन व वेकोलि (वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड) कडे निवेदने देत आंदोलनांचा मार्ग अवलंबला होता. अखेर या दीर्घ संघर्षानंतर शेतकऱ्यांच्या मागणीला काही प्रमाणात यश मिळताना दिसत असून, या आठवड्यात महसूल, कृषी व वेकोलि विभागाच्या संयुक्त समितीने प्रत्यक्ष शेतात पिकांच्या नुकसानीची पाहणी केली..वेकोलिच्या कोळसा खाणींतून निघणारा दगडी कोळसा वणी व घुग्घूस रेल्वे सायडींगकडे ट्रकद्वारे वाहून नेला जातो. वाहतुकीदरम्यान ट्रकमधून कोळसा रस्त्यावर सांडत असून, त्यामुळे मोठ्या प्रमाणात कोळसा धूळ निर्माण होते. ही धूळ रस्त्यालगतच्या शेतातील पिकांवर साचल्याने पिके काळवंडतात व उत्पादनात लक्षणीय घट होते. .Farmer Support: शेतकरी आत्महत्याप्रकरणी कुटुंबाला आर्थिक मदत.परिणामी, शेतकऱ्यांचे नुकसान होत असून, शिरपूर-शिंदोला व वणी-कोलेरा रस्त्यालगतच्या शेकडो शेतकऱ्यांचे उपजीविकेचे साधनच संकटात आले आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानभरपाई मिळणे हा त्यांचा हक्क असल्याचे सांगत शेतकऱ्यांनी गेल्या दोन वर्षांपासून प्रशासन व वेकोलिकडे सातत्याने मागणी केली. .यासाठी खांदला फाटा व निळापूर येथे रास्तारोको आंदोलन करीत कोळसा वाहतूकही काही काळ रोखण्यात आली होती. वेकोलिकडून आश्वासने देण्यात आल्यानंतर आंदोलने तात्पुरती मागे घेण्यात आली. मात्र प्रत्यक्ष दिलासा मिळाला नाही. यानंतर शासनाकडून लाटकर समिती व खारगे समितीची नियुक्ती करण्यात आली. तरीही शेतकऱ्यांना ठोस लाभ न मिळाल्याने त्यांनी पुन्हा रास्तारोको आंदोलन केले. .Farmers Support: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी विद्यार्थ्यांचा अडीच लाखाचा निधी.अखेर प्रशासन व वेकोलिला जाग येत वेकोली अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यात आली. या पाहणी पथकात ग्राम महसूल अधिकारी पत्रे, कृषी सहायक घुगे, वेकोलिचे अधिकारी हेमंत पांडे यांचा समावेश होता. तसेच जिल्हा खनिज प्रतिष्ठानचे सदस्य विजय पिदूरकर, खांदलाचे सरपंच हेमंत गौरकार व नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते..अहवाल खारगे समितीकडे पाठविणारआता या पाहणीचा सविस्तर अहवाल प्रशासनामार्फत खारगे समितीकडे पाठविण्यात येणार असून, त्यानंतर वेकोलिकडून मागील दोन वर्षांची नुकसानभरपाई मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.