Solapur News : कांद्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले गावात दीड हजार एकरांपेक्षा जास्त क्षेत्रावर सौरऊर्जा प्रकल्प होणार आहे. या प्रकल्पासाठी देशातील नामवंत कंपनीने शेतकऱ्यांच्या जमिनी भाडेपट्ट्यावर घेतल्या आहेत. निसर्गाचा लहरीपणा, सरकारची धोरणे यामुळे शेती व्यवसाय कर्जबाजारी करत असल्यामुळेच शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे..केंद्र व राज्य सरकारने अपारंपरिक ऊर्जा स्रोत वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यात मोठ्या प्रमाणात सौरऊर्जा निर्माण करणारे प्रकल्प तयार होत आहेत. यासाठी खासगी उद्योगांना सरकार मोठ्या प्रमाणात सवलती जाहीर करत आहे. .याच योजनेअंतर्गत उत्तर सोलापूर तालुक्यातील काही गावांमध्ये सौरऊर्जा प्रकल्प सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. कांदा उत्पादक गाव म्हणून ओळख असणाऱ्या रानमसले गावामध्ये जवळपास दीड हजार एकर क्षेत्रावर सौरऊर्जा प्रकल्प होणार आहे. यासाठी देशातील नामवंत कंपनीने शेतकऱ्यांच्या जमिनी भाड्याने घेतल्या आहेत.रानमसले परिसर हा खरीप कांद्यासाठी प्रसिद्ध आहे..Solar Project : सौर कृषी वाहिनीसाठी दिलेल्या जमिनींना वाढीव भाडे.दुष्काळी पट्टा म्हणून ओळख असणाऱ्या या भागात पावसाळ्यात दर्जेदार खरीप कांद्याचे उत्पादन घेतले जाते. येथील संपूर्ण अर्थकारणच कांदा उत्पादनाभोवती फिरते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून कांद्याचे पीक धोक्यात आले आहे. .त्याचबरोबर केंद्र सरकारने कांदा निर्यातीच्या बाबतीत राबवलेल्या ग्राहकधार्जिण धोरणामुळे उत्पादक अडचणीत सापडला आहे. यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्यांनी शेतीपासून दूर होण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे..Electricity : भूभाड्याबाबत नव्वद दिवसांत निर्णय घ्या.आजच्या वेळेला जरी आर्थिकदृष्ट्या भाडेपट्टा शेतकऱ्यांना फायदेशीर होत असल्याचे दिसून येत असले तरी भविष्यात रुपयाचे अवमूल्यन किती होते, यावरच शेतकऱ्यांच्या या निर्णयाचा परिणाम होणार आहेत..असे होत आहेत करारशेतकऱ्यांकडून सौरऊर्जा प्रकल्पासाठी २७ ते २९ वर्षाच्या दीर्घ काळासाठी जमिनी घेतल्या जात आहेत भाडेपट्ट्यावरशेतकऱ्यांना प्रतिएकर वार्षिक ५० ते ६० हजार रुपये इतके भाडे दिले जात आहेभाड्यात प्रतिवर्ष तीन टक्क्यांची वाढ करण्याची आहे तरतूदभाडेपट्टा करारानुसार शेतकऱ्याला कर्ज काढण्यास मनाई.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.