Buldana News: बुलडाणा जिल्ह्यात अवैध सावकारी कर्जाच्या त्रासातून होणारी शेतकऱ्यांची पिळवणूक आणि आत्महत्या यांना आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. जिल्ह्याच्या विविध भागांतील अवैध सावकारांकडील जमिनी मूळ मालक असणाऱ्या शेतकऱ्यांना परत करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत जमिनी परत मिळालेल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार करीत आभार मानले. .जिल्हाधिकारी पाटील यांच्या निर्देशानुसार जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियमातील कलमांनुसार यासंदर्भात कार्यवाही सुरू आहे. याअंतर्गत जलदगतीने सुनावणी घेऊन प्रकरणे निकाली काढली जात आहेत. यातील बहुतांशी प्रकरणांमध्ये चौकशीअंती शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय दिले जात असून, अवैध सावकारांवर गुन्हेदेखील दाखल केले जात आहेत..Illegal Moneylending: रिसोड तालुक्यात बेकायदा सावकारांविरुद्ध धडक कारवाई.या शेतकऱ्यांमध्ये विशेषतः नागेश केशव कोल्हारे (रा. घाटबोरी, ता. मेहकर) यांची सावकाराकडील ३ एकर २४ गुंठे जमीन, विजय व्यवहारे (रा. पोफळी, ता. मोताळा) यांची ६२ गुंठे जमीन, रवींद्र कांडेलकर (रा. वाघोळा ता. मलकापूर) यांची ८२ गुंठे जमीन, विजय रामदास राठोड (रा. हिवरा गडलिंग, ता. सिंदखेडराजा) यांची ७ एकर ३० गुंठे जमीन,.Illegal Moneylending: राहू बेट परिसराला अवैध सावकारीचा विळखा.शंकर कोंडिबा वाघ (रा. पांगरी, ता. देऊळगावराजा) यांची १.३८ हेक्टर जमीन, संजय उत्तम पाचरणे (रा. मेहकर) यांची ०.७१ हेक्टर जमीन त्यांना परत मिळाल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली. या वेळी सावकारी कर्जामुळे मातृत्व हरवलेल्या वैष्णवी कैलास ढोले या मुलीने आणि तिच्या वडिलांनी देखील त्यांच्या संघर्षात जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले..सावकारांविरोधात ५५ प्रकरणांत गुन्हेजिल्हा उपनिबंधक प्रशासनाने या मोहिमेअंतर्गत महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियमातील कलमांनुसार जिल्ह्यातील ६९ प्रकरणांत अवैध सावकारांकडील ७४.२७ हेक्टर आर शेतजमीन शेतकऱ्यांना परत करण्यात आली आहे. यात ५५ प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच ६५१ प्रकरणांची चौकशी पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक डॅा. महेंद्र चव्हाण यांनी दिली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.