Maize Khandesh Cultivation: खानदेशात उडीद व मूग लागवडीखालील क्षेत्र सातत्याने घटत असून, शेतकऱ्यांचा कल आता सोयाबीन आणि मका पिकांकडे वाढत आहे. यंदाही उडीद, मूग तसेच तूर लागवड कमी राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पूर्वी खानदेशात उडीद आणि मूग मिळून ५५ ते ५८ हजार हेक्टरपर्यंत क्षेत्र होते. मात्र सध्या हे क्षेत्र ४० हजार हेक्टरच्याही खाली आले आहे. तुरीचे दर समाधानकारक नसल्याने तूर लागवडही यंदा मर्यादित राहील, असे चित्र आहे..खानदेशात उडीद व मूग पेरणी पावसानंतर केली जाते. मागील हंगामात जळगाव जिल्ह्यात मूगाची सुमारे १५ हजार हेक्टर, तर उडदाची १६ हजार २०० हेक्टरवर लागवड झाली होती. धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत मिळून उडदाची सुमारे ८ हजार हेक्टर, तर मूगाची सुमारे ६ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. सन २०२०-२१ मध्ये खानदेशात उडीद व मूग मिळून सुमारे ५५ हजार हेक्टर क्षेत्र होते..Kharif Crop Planning: खरिपात पाऊस कमी? योग्य नियोजनाने शाश्वत उत्पादन शक्य.त्यावेळी एकट्या जळगाव जिल्ह्यात उडदाची सुमारे १९ हजार हेक्टर, तर मूगाची सुमारे १७ हजार हेक्टरवर लागवड झाली होती. यापूर्वी उडदाचे क्षेत्र २० ते २१ हजार हेक्टरपर्यंत जात होते. मात्र, गेल्या चार वर्षांत पावसातील अनियमितता, जूनमधील खंड, अतिवृष्टी आणि दुष्काळ यांचा मोठा फटका उडीद-मूग पिकांना बसला आहे. २०२३-२४ मध्ये जून महिन्यात तब्बल २२ दिवस पावसाचा खंड पडल्याने पेरणीच होऊ शकली नव्हती. तर अतिवृष्टी झाल्यास उडीद-मूग पिके पूर्णपणे खराब होतात. त्यांचा चाऱ्यासाठीही उपयोग होत नाही..या पिकांचे बियाणेही महाग असून, १० किलो बियाण्यासाठी ८०० ते १४०० रुपये खर्च येतो. त्यासोबत फवारणी, कापणी आणि मळणीचा खर्चही मोठा असतो. हंगामात दर कमी राहतात आणि शेतकऱ्यांकडील साठा संपल्यानंतरच बाजारभाव वाढतात, असा अनुभव आहे. त्यामुळे शेतकरी उडीद-मूग लागवडीपासून दूर जात आहेत..Soybean Seed Treatment: कमी पावसाच्या संकटात सोयाबीन लागवडीपूर्वीचे नियोजन कसे करावे?.२०२२-२३ मध्ये दुष्काळाचा फटका बसला, तर त्यापूर्वीची तीन वर्षे आणि २०२४-२५ मध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांना उडदाचे एकरी दीड क्विंटल उत्पादनही मिळाले नाही. ऑगस्टमध्ये पावसाचा जोर वाढल्याने कापणी-मळणी रखडते, दर्जा घसरतो आणि व्यापारी कमी दर देतात, अशी परिस्थिती निर्माण झाली होती..सोयाबीन, मक्याला पसंतीखानदेशातील काळ्या कसदार जमिनीत उडीद-मूगऐवजी सोयाबीन व मक्याची लागवड वाढत आहे. यंदा अनेक शेतकऱ्यांनी मका आणि सोयाबीन लागवडीचे नियोजन केले आहे. मका पिकात तूर किंवा सोयाबीनमध्ये तूर अशी आंतरपीक पद्धतीही शेतकरी अवलंबत आहेत. हलक्या व मध्यम जमिनीत तूर लागवड काही प्रमाणात होणार असली, तरी एकूण क्षेत्र घटण्याची शक्यता आहे. काळ्या कसदार जमिनीत मात्र मक्याला अधिक प्राधान्य मिळत असल्याचे चित्र आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.