Solapur Farmers Protest: धोत्री (ता. दक्षिण सोलापूर) गोकुळ साखर कारखान्याकडे असलेल्या थकीत ऊस बिलाच्या मागणीसाठी सोलापुरात शेतकऱ्यांचे आंदोलन अत्यंत तीव्र आणि आक्रमक झाले आहे. गेल्या १७ दिवसांपासून सोलापूर येथील जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे शांततापूर्ण मार्गाने धरणे आंदोलन सुरू होते. .मात्र प्रशासनाकडून आणि कारखाना व्यवस्थापनाकडून कोणतीही ठोस दखल न घेतली गेल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बुधवारी (ता. १०) थेट छत्रपती संभाजी महाराज तलावाकडे धाव घेत ‘जलसमाधी’ आंदोलन सुरू केले. पोलिस प्रशासनाने आंदोलकांना अडवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु संतप्त आंदोलकांनी पोलिसांचे कडे तोडून तलावाचा परिसर गाठला. या वेळी पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये जोरदार वादविवाद आणि झटापट झाली..Sugarcane Farmers Protest: ओंकार साखर कारखान्यासमोर थकीत ऊस बिलासाठी आंदोलन.‘‘आम्ही काय भीक मागत आहोत का,’’ असा संतप्त सवाल करत काही शेतकऱ्यांनी थेट तलावाच्या पाण्यात उड्या घेतल्या. हे जलसमाधी आंदोलन सुरू करताच पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून काही अधिकाऱ्यांनी स्वतः तलावात उतरून शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला..Sugarcane FRP: ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ४,६०१ कोटी एफआरपी थकीत, ४५ कारखाने रडारवर.आंदोलनक शेतकऱ्यांची समजूत काढण्याचे आणि त्यांना पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून युद्धपातळीवर करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर शेतकरी पाण्यात उतरले असून, त्यांनी कारखाना व्यवस्थापन आणि शासनाच्या धोरणांविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली..जोपर्यंत थकीत ऊस बिलाची रक्कम थेट खात्यात जमा होत नाही किंवा त्याबाबत ठोस लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत पाण्यातून बाहेर न येण्याचा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.