Jalgaon News: यावर्षी गिरणा परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे मुबलक पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे या भागातील बहुतांश शेतकरी यंदा टरबूज पिकाकडे वळल्याचे दिसून येत आहे. चाळीसगाव तालुक्यात जवळपास ३०० हेक्टरवर टरबूज लागवड होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे. टरबूज लागवडीसाठी पारंपरिक पद्धतीला फाटा देत शेतकऱ्यांनी ‘मल्चिंग पेपर’चा वापर करून सुधारित पद्धतीचा स्वीकार केल्याने यंदा टरबुजाचे चांगल्यापैकी उत्पन्न होण्याचे आशादायक चित्र गिरणा पट्ट्यात दिसून येत आहे..गिरणा परिसरासाठी वरदान ठरलेल्या गिरणा धरणात यंदा मुबलक पाणीसाठा आहे. याशिवाय परिसरातील अनेक लहानमोठे बंधारे, धरणांमध्ये पाणी असल्याने टरबूजांचे उत्पादन घेण्यासाठी चांगली परिस्थिती आहे. त्यादृष्टीने या भागातील बहाळ, जामदा, मेहुणबारे, वरखेडे, तिरपोळे, पिंपळवाड म्हाळसा, उंबरखेडे, पिलखोड, टाकळी प्र. दे., वाघडू, वाकडी, रोकडे, रांजणगाव, पिंपरखेडे, पाटणा आदी भागात टरबूजांची लागवड होत असल्याचे दिसून येत आहे. तर काही ठिकाणी शेती तयार करण्याची लगबग सुरु आहे. टरबुजाच्या लागवडीचा कृषी विभागाकडे सध्या अधिकृत आकडा नसला तरी यंदा टरबूज लागवडीत लक्षणीय वाढ होणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले..Watermelon Cultivation : खानदेशात कलिंगड लागवड सुरू.‘मल्चिंग पेपर’ टाकून लागवडगिरणा पट्ट्यात वेलवर्गीय फळांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा आतापर्यंतचा अनुभव पाहता, त्यांना चांगला लाभ झालेला आहे. त्यामुळे इतरही शेतकरी यंदा टरबूज, खरबूज, काकडी यासारख्या वेलवर्गीय पिकांकडे वळले आहेत. ही सर्व पिके जवळपास तीन महिन्यांच्या कालावधीत काढणीवर येतात. .Watermelon Cultivation : खानदेशात कलिंगड लागवड सुरू.शेती व्यवसायात कालानुरुप झालेल्या बदलामुळे शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीचा वापर टरबूज उत्पादनासाठी केल्याचे दिसून येत आहे. बहुतांश शेतांमध्ये मातीचे बेड तयार करून त्यावर ‘मल्चिंग पेपर’ टाकून सुधारित पद्धतीने टरबूज लागवड केली जात आहे. पूर्वी टोकन पद्धतीने लागवड होत होती. मात्र, या पद्धतीत उगवण क्षमता कमी राहते. शिवाय न उगवलेल्या ठिकाणी पुन्हा बी टोकावे लागते. त्यामुळे बहुतांश शेतकरी सुरवातीला जमिनीची मशागत करून माती भुसभुशीत केल्यानंतर ‘कोकोपीट ट्रे’ मधील रोपे आणून त्यांची लागवड करताना दिसत आहेत..टरबूज लागवडीसाठी आवश्यकता...पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे असते.पीक जसे वाढेल तशी पाण्याची गरजही वाढते.हलकी व पाण्याचा निचरा असणारी जमीन उपयुक्तउन्हाळ्यात जानेवारी ते मार्च या कालावधीत लागवड करता येते.ठिबकद्वारे खते दिल्यास उत्पादन वाढीला चांगला प्रतिसाद मिळतो.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.