Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील देवगाव येथील तुती शेती व रेशीम उद्योगाला वाशीम जिल्ह्यातील किन्हीराजा व येडशी येथील शेतकऱ्यांनी भेट दिली. या शेती उद्योगातील संधी आणि अर्थकारण शेतकऱ्यांनी या वेळी जाणून घेतले. या दौऱ्यात किन्हीराजा, मेडशी, टो या गावातील जवळपास ३० शेतकरी व राज्य क्षमता बांधणी कक्ष सदस्य सहभागी झाले होते..वाशीम जिल्हा रेशीम उद्योग कार्यालयाच्या वतीने या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा अभ्यास दौऱ्यात देवगाव (जि. छत्रपती संभाजीनगर) या गावातील रेशीम उद्योग करणारे शेतकरी रेशीम रत्न शहादेव ढाकणे व सदाशिव गिते यांच्या तुती शेती व रेशीम शेडला भेट दिली. श्री. ढाकणे यांच्या शेतातील तुती लागवड, अंडीपुंजसाठी लागणारे कोश निर्मिती, शेड नियोजन, दैनंदिन अळी संगोपन, बाजार भाव व रेशीम शेतीचे आर्थिक नियोजन व होणारा नफा, मनरेगा व रेशीम विभागाच्या विविध योजनांचा फायदा आदी बाबींवर चर्चा झाली..Silk Industry : ‘रेशीम उद्योगात उत्पन्न वाढविण्याची संधी’.कमी खर्चात २ लाखांपेक्षा अधिक निव्वळ नफा मिळवून देणारा हा व्यवसाय असून. कमी मजुरांत शेतकऱ्यांना लखपती करणारा हा व्यवसाय असल्याचे पुढे आले. सद्यःस्थितीत शेतकरी अनेक आव्हानांना सामोरे जात शेती व्यवसाय करत आहेत. कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळाशी सामना करत आपले उत्त्पन्न वाढीसाठी अविरत कष्ट उपसत आहेत. .या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी आता पारंपरिक शेतीला फाटा देऊन आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून आधुनिक शेतीकडे वळावेच लागेल. यामध्ये रेशीम लागवड हा किफायतशीर निवडला तर शेतकरी अधिक पैसे शेतीतून मिळवू शकतो, असेही पुढे आले. या दौऱ्यात बिना नांगरणी शेती व कमी खर्चात शेतीचे गणित समजून सांगणारे दीपक जोशी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. हा दौरा आयोजित करणारे वाशीम जिल्हा रेशीम विकास अधिकारी सुनील फडके यांनी प्रशासन शेतकऱ्यांसमवेत असल्याचा विश्वास दिला. .Silk Industry: रेशीम संचालनालयाला मनरेगा कार्यान्वयन यंत्रणा म्हणून मान्यता .जिल्ह्यात रेशीम शेतीसाठी सर्वजण प्रेरक म्हणून काम करू, असे त्यांनी सांगितले. विदर्भातील शेतकऱ्यांना रेशीम शेती हा किफायतशीर शेती व्यवसाय असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मनरेगा व रेशीम उद्योग विभागामार्फत मिळणाऱ्या योजनेचा लाभ घेऊन रेशीम शेतीकडे वळावे व जे शेतकरी रेशीम शेती समजून घेऊन करू इच्छित आहेत, त्यांनी जिल्हा रेशीम विभाग व मनरेगा विभागास अवश्य भेट द्यावी व या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही या वेळी करण्यात आले..प्रादेशिक तुती लागवड व प्रशिक्षण केंद्रालाही भेटया दौऱ्यानंतर प्रादेशिक तुती लागवड व प्रशिक्षण केंद्र चिकलठाणा येथे भेट देऊन शासनामार्फत या ठिकाणी सुरू असलेले आधुनिक रेशीम मार्गदर्शन केंद्र, अंडीकोश निर्मिती केंद्र, तुती लागवड प्लॉटला भेट दिली व रेशीम शेती संदर्भातील अनेक प्रश्न, अडचणी याबाबत छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा रेशीम विकास अधिकारी बी. डी. डेंगळे यांच्याशी शेतकऱ्यांनी चर्चा केली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.