Sugarcane Harvest: उंब्रज, जि. सातारा : वहागाव (ता. कराड) येथील शेतकऱ्यांनी वहागावसह परिसरातील ऊसतोड टोळ्यांसाठी नियमावली तयार केली आहे. परिसरातील ऊसतोड नियमावलीनुसार करण्यात यावी, असा निर्णयही शेतकऱ्यांनी बैठकीत घेतला आहे..शेतकऱ्यांना आपल्या पशुधनासाठी उसाचे वाडे चारा म्हणून उपयोग होतो. अनेकदा वाड्यावरून ऊस तोडणाऱ्या टोळ्या व स्थानिक शेतकऱ्यांमध्ये वादावादी होते. ऊस टोळ्यांकडून वाडे बांधण्यासाठी शेतकऱ्यांकडे जादा पैशाची मागणी करण्यात येते. टोळ्यांनी ऊस तोडताना पैशाची मागणी केली, तर शेतकरी निमूटपणे सर्व सहन करत आपला ऊस लवकर कारखान्याला जावा, या प्रयत्नात असतो. याचाच गैरफायदा घेत ऊस तोडणाऱ्या टोळ्यांकडून शेतकऱ्याची आर्थिक पिळवणूक केली जाते. या कारभाराविरोधात वहागावमधील शेतकऱ्यांनी एकत्र येत बैठक घेतली. या वेळी ऊस तोडणाऱ्या टोळ्यांच्या मनमानी कारभाराबाबत चर्चा होऊन नियमावली तयार करण्यात आली आहे. डिसेंबरपर्यंत वाडेबांधणीचा दर ५० रुपये प्रति गुंठा, तसेच ज्या शेतकऱ्यांना वाडे बांधून घेण्याची गरज नाही. त्यांनी प्रति गुंठा ३० रुपयांप्रमाणे पैसे द्यायचे आहेत. .Sugarcane Harvest: ऊस तोडणीचे शास्त्रीय नियोजन.जानेवारीपासून वाडेबांधणीचा दर प्रति गुंठा ७० रुपये राहील, जर वाडे मुजवले, तर ३० रुपये द्यायचे आहेत. ट्रॅक्टर चालकाला जेवणाचा डबा किंवा शंभर रुपये खेपेला द्यावेत, असे निर्णय बैठकीत घेण्यात येऊन तशी नियमावली तयार केली आहे. वहागाव परिसरात सर्व कारखान्यांच्या ऊस तोडणी कामगारांसाठी नियमावली लागू असेल, असेही बैठकीत ठरविण्यात आले..Kolhapur Sugar Factory: 'बिद्री' पाठोपाठ भोगावती कारखान्याकडून सर्वाधिक ऊसदर जाहीर, 'एफआरपी'पेक्षाही अधिक....तर ऊसतोड करू न देण्याचा ठराववहागाव परिसरात अनेक कारखान्यांच्या टोळ्यांनी शेतकऱ्यांनी तयार केलेल्या नियमावलीप्रमाणे ऊसतोड करून सहकार्य करावे. ही नियमावली ऊसतोड कामगारांना मंजूर नसेल, तर कोणत्याही कारखान्याची ऊस तोडणारी टोळी असली, तरी ऊस तोडू देणार नाही, असा एकमुखी ठराव शेतकऱ्यांनी या वेळी बैठकीत घेतला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.