Parbhani News : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत चालू आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये बुधवार (ता. १०) पर्यंत परभणी जिल्ह्यातील ७ तालुक्यातील ८१ लाभार्थी शेतकऱ्यांनी ६६.३६ ५७८ हेक्टर फळबाग लागवड केली आहे. याअंतर्गत ४५ हजार ११९ रुपये खर्च झाला आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली..२०२५-२६ मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यामध्ये १ हजार ५०० हेक्टर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट आहे. या अंतर्गत २६४ सहायक कृषी अधिकाऱ्यामार्फत सर्व ९ तालुक्यांतून १ हजार १२३ शेतकऱ्यांनी ९६९.१२ हेक्टरवर फळबाग लागवडीसाठी अर्ज केले आहेत. .Orchard Plantation Scheme : ‘रोहयो’ची फळबाग लागवड उद्दिष्ट दहा हजारांनी घटविली.त्यापैकी ८६३.९६ हेक्टरवर फळबाग लागवडीसाठी तांत्रिक मान्यता देण्यात आली. एकूण ९९८ शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. आजवर फळबाग लागवडीसाठी ७४.०७ हेक्टरवर खड्डे खोदण्यात आले आहेत. त्यापैकी ८१ शेतकऱ्यांनी ६६.३६ हेक्टरवर फळबाग लागवड केली आहे. त्यावर ४५ हजार ११९ रुपये खर्च झाला..परभणी तालुक्यात ९ शेतकऱ्यांनी ८.७० हेक्टर फळबाग लागवड केली. त्यात आंबा ३ हेक्टर, नारळ २.७० हेक्टर, केळी ३ हेक्टर लागवड आहे. जिंतूर तालुक्यात ३४ शेतकऱ्यांनी २२.४९ हेक्टरवर फळबाग लागवड केली असून, त्यात आंबा ४ हेक्टर, चिकू २ हेक्टर,पेरू ०.८० हेक्टर, सीताफळ १ हेक्टर, केळी १२.६९ हेक्टर, तुती २ हेक्टर लागवड आहे..Orchard Plantation : ‘फुंडकर’ योजनेतून अकराशे हेक्टरवर फळबाग लागवड.सेलू तालुक्यात ५ शेतकऱ्यांनी ६.१५ हेक्टरवर फळबाग लागवड केली त्यात आंबा ३.४० हेक्टर, लिंबू ०.७५ हेक्टर,केळी २ हेक्टर लागवड आहे. मानवत तालुक्यात १८ शेतकऱ्यांनी १८.२० हेक्टर फळबाग लागवड केली असून त्यात संत्रा १२.६० हेक्टर, केळी ५.२० हेक्टर, शेवगा ०.४० हेक्टर लागवड आहे..पाथरी तालुक्यात ६ शेतकऱ्यांनी २.४० हेक्टर केळी लागवड केली. गंगाखेड तालुक्यात ४ शेतकऱ्यांनी ४.३० हेक्टर फळबाग लागवड केली त्यात आंबा २ हेक्टर, सीताफळ १ हेक्टर, केळी १.३० हेक्टर लागवड झाली. पूर्णा तालुक्यात ५ शेतकऱ्यांनी ४.१२ हेक्टर फळबागेमध्ये केळी ३.५७ हेक्टर, बांबू ०.५५ हेक्टर लागवड झाली आहे. सोनपेठ व पालम तालुक्यांत फळबाग लागवड झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले..परभणी जिल्हा मनरेगा फळबागलागवड स्थिती (हेक्टरमध्ये)फळपिक लागवड क्षेत्रआंबा १२.४०चिकू २संत्रा १२.६०नारळ २.७०सीताफळ २केळी ३०.१६शेवगा ०.५५.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.