Nanded News: श्री क्षेत्र माळेगाव यात्रेत शनिवारी (ता. २०) जिल्ह्यातील १६ शेतकऱ्यांना कै. डॉ. शंकरराव चव्हाण कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या प्रणिता देवरे-चिखलीकर यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. .या वेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, कृषी विकास अधिकारी डॉ. नीलकुमार ऐतवडे, समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, माजी सभापती आनंद पाटील, रोहित पाटील, मोहीम अधिकारी सचिन कपाळे, गणेश सावळेे, पोखर्णी केव्हीकेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख, रमेश देशमुख आदी उपस्थित होते. .Agricultural Excellence Award: वसंतराव नाईक प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर.नांदेड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून दरवर्षी माळेगाव यात्रेत कृषीनिष्ठ शेतकरी पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. या वेळी वर्ष २०२५-२६ साठी निवड केलेल्या १६ प्रगतिशील शेतकऱ्यांचा स्मृतीचिन्ह, शाल, पुष्पहार, जोड आहेर, प्रमाणपत्र देऊन सपत्नीक गौरव करण्यात आला. शेतीत सातत्यपूर्ण उत्पादन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व प्रेरणादायी कार्यासाठी या शेतकऱ्यांची निवड करण्यात आली. समाज कल्याण विभागातर्फे आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांचा प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला..Agriculture Award : कृषी पुरस्कार सोहळ्यावर नागपूरची छाप.पुरस्कार मिळालेल्यांत दीपक पावडे - पुणेगाव (नांदेड), सोमेश्वर खानसोळे - वाडी नियमतुल्लापूर (मुदखेड), आनंदा अंभोरे - सावरगाव (अर्धापूर), बालाजी कदम - चिदगिरी (भोकर), उत्तम काळे - मरडगा (हदगाव), बाबूराव वानखेडे - पळसपूर (हिमायतनगर), परसराम फोले - लोखंडवाडी (किनवट),.शेषराव राठोड - पापळवाडी (माहूर), राजू ढगे - इज्जतगाव (उमरी), सूर्यकांत उमरे - सालेगाव (धर्माबाद), पोचाबाई तुडमे - सगरोळी (बिलोली), सुनील चिमणपाडे - कुडली (देगलूर), रामदास माळेगावे - गोजेगाव (मुखेड), बळीराम रुंझे - संगुचीवाडी (कंधार), विश्वनाथ जायभाये - नगारवाडी (लोहा), संदीप शिंदे - मांजरम (नायगाव) यांचा समावेश आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.