Chandrapur News : उन्हाळी धानाची शेतकऱ्यांनी आधारभूत केंद्रावर विक्री केली. मात्र नागभीड तालुक्यातील एक हजारावर शेतकऱ्यांच्या धानाचे चुकारे अद्यापही मिळाले नाही. सणासुदीच्या तोंडावर धान चुकारे खात्यावर जमा करावे, अशी मागणी जिल्हा बँकेचे संचालक गजानन पाथोडे यांनी केली आहे. .नागभीड तालुक्यात जवळपास अकराशे हेक्टरवर उन्हाळी धान पिकाची लागवड करण्यात आली. दोन ते तीन महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांच्या हाती धानाचे पीक आले. खुल्या बाजारात उन्हाळी धानाला भाव नसल्याने शेतकऱ्यांनी धान विक्री साठी आधारभूत केंद्राकडे धाव घेतली. .कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री सोसायटी नागभीड, गुरुदेव राइस मिल कोर्धा या तीन आधारभूत केंद्रावर धानाची विक्री शेतकऱ्यांनी केली. मात्र अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात उन्हाळी धानाचे चुकारे जमा झाले नाही. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहे. उन्हाळी धान लागवडीसाठी शेतकऱ्यांनी सावकारांकडून कर्ज घेतले. आता ते फेडायचे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे..Paddy Market : धान तुटीवरून सरकार आणि सेवा सोसायटी आमनेसामने.नागभीड कृषी उत्पन्न समिती समितीमध्ये ६५२ शेतकऱ्यांनी २८ हजार १५३.३४ क्विंटल धानाची विक्री केली. यापैकी ६१ शेतकऱ्यांच्या खात्यावर ६७ लाख ३० हजार ८३५ एवढ्या रकमेचे धानाचे चुकारे जमा झाले. तर उर्वरित ५९१ शेतकऱ्यांचे पाच कोटी ८० लाख २१ हजार ८४७ रुपये बाकी आहेत. नागभीड खरेदी विक्री सोसायटीमध्ये ३२५ शेतकऱ्यांनी १२ हजार ८६३.६३ क्विंटल धान विक्री केली..पैकी १२३ शेतकऱ्यांच्या खात्यावर १ कोटी २० लाख ७४ हजार २६४ रुपयांचे धानाचे चुकारे जमा झाले.२०२ शेतकऱ्यांच्या ७ हजार ६१३.९३ क्विंटल चुकारे अजून बाकी आहेत. गुरुदेव राइस मिल कोर्धा या आधारभूत केंद्रावर ४५१ शेतकऱ्यांनी धान विक्री केली. त्यातील २११ शेतकऱ्यांच्या खात्यात धानाचे चुकारे जमा झाले. २४० शेतकरी अजूनही प्रतीक्षेत आहेत..Paddy Market : हेडरी धान घोटाळा उघडकीस: वर्षभरानंतर आरोपींना अटक.शेतकरी हा अर्थ व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात उन्हाळी धान विक्रीचे चुकारे लवकरात लवकर जमा करावे अशी विनंती सरकारला करण्यात आली आहे. याचा पाठपुरावा आमदार बंटी भांगडिया करणार आहेत, अशी माहिती गजानन वासुदेवराव पाथोडे यांनी दिली..उन्हाळी धानाचे चुकारे न जमा न झाल्याबाबत शासनाकडे सतत पाठपुरावा सुरू आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा व्हायला सुरवात होईल. काही तांत्रिक अडचणी आल्याने त्या सोडविण्याचे काम सुरू आहे.- विश्वनाथ तिवाडे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी चंद्रपूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.