Ahilyanagar News: दुष्काळी पट्टा असलेल्या करंजी (ता. पाथर्डी) परिसरातील शेतकऱ्यांना संत्रा पिकाने दिलासा दिला आहे. यंदा संत्र्याला प्रती किलो ६५ ते ७५ दर रुपये मिळत असल्याने अनेक वर्षांनंतर संत्रा उत्पादक शेतकरी समाधानी आहेत. दुष्काळी परिस्थितीत अल्प पाण्यावर बागा जोपासल्याचे फळ मिळाल्याची भावना या भागातील शेतकरी व्यक्त करत आहेत. .पाथर्डी तालुक्यातील बहुतांश भाग दुष्काळी आहे. शाश्वत पाणी नसल्याने शेती सतत अडचणीत असते. मात्र तालुक्यातील करंजीसह भोसे, सातवड, दगडवाडी, घाटशिरस, जोडमोहोज, लोहसर खांडगाव, कवडगाव, जोहारवाडी, देवराई, निंबोडी, वैजू बाबुळगाव, शिराळ चिचोंडी, कोल्हार, तिसगाव, मिरी या गावाच्या शिवारामध्ये अल्प पाण्यावर येणारे पीक म्हणून संत्र्याची मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याने लागवड केली आहे..Orange Farming: संत्रा फळांचा दर्जा, आकार राखण्यासाठी प्रयत्न.कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार या परिसरात सुमारे पाचशे हेक्टर क्षेत्रावर संत्रा लागवड आहे. दुष्काळी पट्ट्यात मोठ्या प्रमाणात संत्र्याचे पीक घेतले जात असल्यामुळे ही गावे ‘ऑरेंज व्हिलेज’ झाली आहेत. या भागात सुमारे पंचवीस ते तीस वर्षांपासून फळपिके घेतली जात आहेत. त्यात प्रामुख्याने संत्रा पीक अधिक प्रमाणात आहे. दरात सतत पडझड होत असते. दर मिळाला नाही तरी सातत्याने दुष्काळाचा फटका बसत असलेल्या या भागात शेतकऱ्यांनी संकट काळात संत्रा फळबागा टॅंकरच्या पाण्यावर जोपासल्या आहेत. यंदा मात्र अनेक वर्षांनंतर चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक प्रगती साधता आली आहे..Orange Season: संत्रा हंगाम तेजीत, परदेशी संत्रा दाखल.संत्र्याला दरवर्षी साधारण ३० ते ४५ रुपये प्रति किलोला रुपये दर मिळतो. यंदा मात्र संत्र्याच्या दरात कायम तेजी राहिली. संत्र्याला यंदा प्रति ६५ ते ७५ किलो रुपये दर मिळत असल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी पहिल्यांदाच आर्थिक समाधानी झाला आणि अनेक वर्षे संकटातही जोपासलेल्या फळबागांचे फलित मिळाल्याची भावना येथील शेतकरी व्यक्त करत आहेत. सध्या या भागात दहा ते पंधरा ठिकाणी संत्र्याची खरेदी सुरू आहे. राज्यासह देशातील वेगवेगळ्या भागांत तो विक्रीसाठी जात आहे..शेततळ्याचा मोठा आधारपुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांनी शेततळी केली आहेत. या भागात शंभरापेक्षा अधिक शेततळी असून ती पावसाळ्यात भरल्यानंतर बहुतांश शेतकरी त्यावर फळबागा जपतात. .संत्रा पिकाने यंदा पहिल्यांदाच मोठे समाधान दिले आहे. आम्ही अनेक वर्षांपासून संत्र्याचे उत्पादन घेतो. यंदा पहिल्यांदाच उत्पादन आणि दरही चांगला मिळाला आहे.दादासाहेब अकोलकर, शेतकरी, करंजी (ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.