Wardha News: हिंगणघाट तालुक्यातील किंगणगाव येथे गॅस सिलिंडरच्या भीषण स्फोटात शेतकऱ्याचे घर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. या दुर्घटनेत सुमारे आठ लाख रुपयांचे नुकसान झाले असून वृद्ध शेतकरी दाम्पत्याचा संपूर्ण संसार भस्मसात झाला आहे. सुदैवाने, स्फोटाच्या वेळी घरात कोणीही नसल्याने जीवितहानी टळली..प्राप्त माहितीनुसार, सोलकदास चोखोबा पाटील (वय ७०) व त्यांची पत्नी महानंदा सोलकदास पाटील (वय ६८) हे किंगणगाव शिवारातील दिनाच्या शेडमध्ये वास्तव्यास होते. या दाम्पत्याला तीन अपत्ये असून शेती हाच त्यांच्या उपजीविकेचा आधार आहे. बुधवारी सकाळी सोलकदास पाटील हे नेहमीप्रमाणे शेतकामासाठी बाहेर गेले होते. त्यानंतर सुमारे साडेअकराच्या सुमारास घरात अचानक जोरदार स्फोट झाला..Gas Cylinder Test: घरातील गॅस सिलेंडरची वैधता कशी ओळखाल; शिका १ मिनिटात! .सिलेंडरचा स्फोट इतका तीव्र होता की घराचे टिनचे छप्पर उडून गेले, तसेच घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. घरात ठेवलेली रोख रक्कम (सुमारे १५ हजार रुपये), तीन तोळे सोन्याचे दागिने, दुचाकी, टीव्ही, पंखे, १० पोती सोयाबीन व सुमारे पाच क्विंटल कापूस यासह दैनंदिन वापराच्या वस्तू पूर्णपणे नष्ट झाल्या. स्फोटानंतर दागिने व इतर साहित्याचा शोध घेण्यात आला; मात्र काहीही हाती लागले नाही..Gas Cylinder Prices : घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात.घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तत्काळ पोलिस स्टेशन व नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला कळविले. अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. .यावेळी पोलिस उपनिरीक्षक सुनील राम यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या दुर्घटनेमुळे वृद्ध शेतकरी दाम्पत्य उघड्यावर आले असून शासनाकडून तातडीची आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.