Dharashiv News: लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या आधीपासून शेतकरी कर्जमाफीची आशा ठेवून बसला आहे. थकित कर्जामुळे शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळत नाही. दुसरीकडे मुदतीत कर्ज परतफेड केल्यानंतर मिळणारा डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेच्या लाभावरही गदा आली आहे. शेतीच्या विक्रीसह वाटणीसाठी कर्जाच्या बोजामुळे अडचणी येत आहेत. अडचणी येऊनही शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या आशा कायम असून शेतकरी कर्जाचे नवं - जुनं करण्यासोबत कर्जाचे पुनर्गठन करण्याकडे पाठ दाखविताना दिसत आहे. कर्ज चालू थकित आल्यानंतर कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहण्याची भीती शेतकऱ्यांना आहे..जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून पीककर्ज घेतलेला शेतकरी सध्या कर्जमाफीच्या आशेने द्विधा अवस्थेत आहे. सरकारडून दिल्या जाणाऱ्या संभाव्य कर्जमाफीच्या लाभाला मुकू नये, या भीतीने जिल्ह्यातील हजारो थकबाकीदार शेतकरी आपल्या कर्जाचे ‘पुनर्गठण’ करण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. यामुळे शेतकरी व्याजाच्या चक्रव्यूहात अधिकच अडकत चालले आहेत..Farm Loan Waiver: सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे ४ हजार कोटींची थकबाकी.जिल्हा बँकेच्या विविध सोसायट्यांकडून ३५ हजार ४८५ शेतकऱ्यांकडे १६६ कोटी रुपयांची चालू बाकी आहे. तर १४ हजार ८४७ शेतकऱ्यांकडे ८० कोटी रुपयांचे कर्ज थकित आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतून ३ लाखांपर्यंत शून्य टक्का व्याजाची सवलत मिळते. व्याज सवलतीचा लाभ राज्य सरकारकडून डीबीटीने देण्याचा विचार सुरू आहे. या स्थितीत कर्जमाफीच्या आशेपोटी अनेक शेतकऱ्यांनी मुदतीत कर्जाची परतफेड केल्यामुळे त्यांना योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागले आहे. यंदा अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले..यामुळे सरकारने शेतकऱ्यांकडील कर्जाच्या शेतीशी संबंधित कर्जाच्या वसुलीसाठी एक वर्ष स्थगिती दिली असून, कर्जाचे पुनर्गठन करण्यास मंजुरी दिली आहे. व्याज व मुद्दल एकत्र करून नव्याने कर्ज देऊन थकित कर्जाचे पुनर्गठन केले जाते. यामुळे कर्ज चालू बाकीमध्ये येते. दुसरीकडे मुदतीत व्याज भरून कर्जाचे नवंजुनं करून व्याज सवलतीचा लाभ शेतकरी घेतात. नवंजुनंमुळेही कर्ज चालूबाकीमध्ये येते. आजपर्यंतचा कर्जमाफीचा अनुभव लक्षात घेता सरकारकडून थकित कर्ज माफ करण्यात आले आहे. यामुळे शेतकरी माफीच्या आशेने कर्ज थकित ठेवत असून नवंजुनं व पुनर्गठन करण्यास तयार नसल्याचे चित्र जिल्ह्यात आहे..Farm Loan Waiver: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर बोलण्यास मुख्यमंत्र्यांची मनाई.नवीन कर्जासह हस्तांतरासाठी अडचणीमुदतीत कर्जाची परतफेड न केल्यामुळे शेतकऱ्यांना व्याज सवलत योजनेचा लाभ मिळत नाही. कर्जमाफी न मिळाल्यास व्याजाचा भार शेतकऱ्यांना सोसावा लागणार आहे. कर्जमाफी मिळेल की नाही, याबाबत खात्री नाही. या स्थितीत नवीन कर्ज शेतकऱ्यांना मिळत नाही. पीक कर्जाचा सातबारावर बोजा असल्यामुळे कर्ज भरल्याशिवाय शेतीची विक्री करता येत नाही किंवा वाटणी करता येत नाही. अशा फेरफारावर बँकांकडून आक्षेप घेण्यात येत आहेत. दुसरीकडे कर्जाच्या तडजोडीने (सेटलमेंट) वसुलीसाठी बँकेकडून तगादा सुरुच आहे. कर्जमाफीचे स्वरूप व ती कधी मिळणार, याबाबत निश्चित नसल्यामुळे शेतकरी गोंधळले पीक कर्जाबाबत शेतकरी पुरते गोंधळून गेल्याचे चित्र आहे..घेतलेले पीककर्ज नियमित व मुदतीत भरणे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहे. मुदती कर्ज फेडल्यास व्याजाची सवलत मिळते. कर्ज थकित गेल्यास व्याज सवलत मिळत नाही. कर्जाचे पुनर्गठन ही सोय असली, तरी मुद्दल आणि व्याज एकत्र होऊन त्यावर पुन्हा व्याज लागत असल्याने शेतकरी यासाठी पुढे येत नाहीत.- नितीन गोडसे, गट सचिव, विविध कार्यकारी सोसायटी, तेर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.