Palghar News: पूर्वी केवळ भातशेतीवर अवलंबून असणारे कासा आणि परिसरातील शेतकरी आता आधुनिकतेची कास धरत विविध भाजीपाला आणि फुलशेतीकडे वळले आहेत. या महत्त्वपूर्ण बदलामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली असून, त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मोठी मदत मिळाली आहे..भातशेतीसोबत भाजीपाला लागवड करून दुहेरी उत्पन्न मिळवण्याचा कल गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मिरची, टोमॅटो, वांगी, गवार, फ्लॉवर, दुधी, गिलके, भेंडी, काकडी यांसारख्या भाजीपाला पिकांसोबतच अनेक शेतकरी फुलशेतीकडेही वळले आहेत..Modern Fruit Farming: शेतीतच भविष्य शोधलेला‘बायोकेमिस्ट्री’चा तरुण.भाजीपाला पिकांचे वैशिष्ट्य म्हणजे ती केवळ दीड ते दोन महिन्यांत उत्पादन देऊ लागतात. त्यामुळे अल्पावधीतच आर्थिक परतावा मिळत असल्याने शेतकऱ्यांची पसंती भाजीपाला लागवडीला मिळत आहे. भातशेतीसह भाजीपाला उत्पादन करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना सध्या रोजचे हजार ते दीड हजार रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळत असल्याचेसांगण्यात आले.पिकांवर होणारे रोग व कीड नियंत्रणासाठी लागणारी खते व औषधेही स्थानिक पातळीवर सहज उपलब्ध असल्याने उत्पादन खर्चही नियंत्रणात ठेवणे शक्य झाले आहे..Modern Farming: ही प्रगतशील शेती आजोबांची ‘देन’.रोपांची सहज उपलब्धताशेतकऱ्यांचा वाढता कल पाहता, नाशिक आणि मालेगाव येथील नर्सरीमधून आणलेली विविध भाजीपाला रोपे आता कासा येथील कृषी दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात विक्रीस उपलब्ध आहेत. १०० रोपांच्या कॅरेटची किंमत साधारणपणे ₹१०० ते ₹३०० इतकी आहे.रोपांच्या सहज उपलब्धतेमुळे परिसरातील शेतकरीही आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करत आहेत. विशेष म्हणजे, कमी पाण्याच्या जमिनीवरही भाजीपाला लागवड करून शेतकरी अतिरिक्त उत्पन्न मिळवत आहेत..नवे प्रयोग“पूर्वी आम्ही फक्त भातशेतीवर अवलंबून होतो, परंतु आता भाजीपाला लागवडीमुळे अतिरिक्त उत्पन्न मिळू लागले आहे. कृषी विभागाच्या मार्गदर्शनामुळे आधुनिक तंत्रज्ञान समजून घेऊन आम्ही शेतीत नवे प्रयोग करत आहोत.” असे वेती येथील शेतकरी कैलास बसवत म्हणाले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.