Dharashiv News: अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे यंदाच्या रब्बी हंगामातील पेरण्याला विलंब झाला; तरीही आगोटी पेरणी क्षेत्रात ज्वारीचे पीक बहरात आले आहे. कोवळे दाणे टिपण्यासाठी येणाऱ्या पाखरांना हुसकावण्याचे (पाखरं राखणे) काम सध्या शेतकरी करत आहेत..त्यासाठी ज्वारीच्या फडात आटोळा उभारून गोफणगुंड्याने पक्षी हुसकावून लावण्याची पारंपरिक पद्धत आता कालबाह्य झाली आहे. शेतकरी या कामात डिजिटल झाला असून, बाजारात स्वस्तात मिळणारे छोट्या ध्वनिक्षेपकाचा वापर शेतकरी पक्षी हुसकावून लावण्यासाठी करत आहेत..Migratory Birds: उजनीवर स्थलांतरित मत्स्याहारी पक्ष्यांचे आगमन.काही भागात ताटलीचा आवाज करून, तर कुठे फटाके वाजवून पक्ष्यांना फुसकावण्याचे काम सुरू आहे. तालुक्यात सर्वाधिक क्षेत्रात खरीप हंगामातील पिके घेतली जातात. यंदा परती पाऊस व अतिवृष्टीमुळे रब्बी पेरणीसाठी पेरणीला विलंब झाला. शेतकऱ्यांनी हरभरा पेरणीला सर्वाधिक प्राधान्य दिले. गव्हाची पेरणीही शंभर टक्के जास्त झाली आहे. ज्वारीचे पेरणी क्षेत्र मात्र घटले. पाण्याची उपलब्धता असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी रात्रीचा दिवस करून, भारनियमनाचा सामना करत हरभरा, गहू पिकांना पाणी देऊन पिकांची स्थिती चांगली ठेवली आहे..Rare Bird Sighting: ‘नीलकंठा’वर पाणपक्ष्यांचे दुर्मीळ दर्शन.शेतकरी झाला डिजिटल !पारंपरिक शेती पद्धतीत आता आमूलाग्र बदल झालेला आहे. यांत्रिकी पद्धतीने शेती व्यवसाय सुरू आहे. त्यामुळे शेतकरी डिजिटल झाला आहे. पाखरांचा घोळका परतविण्यासाठी ज्वारीच्या फडात पारंपरिक पद्धतीची आटोळ्याची उभारणी आता क्वचित ठिकाणी दिसते आहे. गोफणीचा वापर तर अगदी कमी झाला आहे. छोट्या भोंग्यातून हाँ ... हुँ .. हुर्रर्र ... असा आवाज काढत पाखरं हाकण्याचा प्रयत्न केला जातोय. जुन्या साड्यांचे कुंपण, माणसाचे बुजगावणे, रंगीबेरंगी रेडियमच्या पट्ट्या तसेच पंख्याच्या पात्यातून स्टीलच्या ताटलीवर होणारा कर्कश आवाजाचा प्रयोगही केला जातोय..रब्बी हंगामात पूर्वी ज्वारी पिकाचे क्षेत्र वाढलेले असायचे. आता क्षेत्र कमी झाले आहे. पेरणी ते काढणीपर्यंत अनेक संकटाला सामोरे जात उत्पन्न घ्यावे लागत आहे. मोठ्या मेहनतीने पिकविलेल्या ज्वारी पिकाची शेवटच्या टप्प्यात भरलेल्या कणसांची राखणं महत्त्वाची असते. पक्षी, पाखरांनाही ज्वारीचे कोवळी दाणे आवडतात. हल्ली पाखरांची संख्या कमी असली तरी सकाळी आणि सायंकाळच्या वेळी येणाऱ्या पाखरांना परतावण्यासाठी शेतकरी शिवारात असतो. - रवी मुळे, शेतकरी आष्टा (जहागीर).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.