Land Aquisition Issue: करंजी एमआयडीसीच्या नावाखाली बारा गावांतील दहा हजार एकर सुपीक शेतजमीन हडपण्याचा डाव सरकार भांडवलदारांना सोबत घेऊन करीत आहे. याविरोधात हजारो शेतकरी एकवटले आहेत. चंद्रपूर जिल्ह्याच्या गोंडपिंपरी तालुक्यातील बोरगांव येथे ८ मे रोजी शेतकरी परिषद पार पडली. .या परिषदेला तब्बल तीन हजार शेतकरी उपस्थित होते. शेतकरी एकता संघर्ष कृती समितीच्या पुढाकारात ही परिषद झाली. या वेळी प्रा. डाॅ. सुरेश माने, प्रबोधनकार अनिरुद्ध वनकर, अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सदस्य अरुण लाटकर, ॲड. दीपक चटप यांनी मार्गदर्शन केले आहे..Beed Land Scam: भूसंपादन गैरव्यवहारात बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी पाठक यांना अटक.पिढ्यानपिढ्या जी शेती आपल्या आयुष्याचा आधारस्तंभ ठरली. ती शेती उद्योगासाठी जाणार. आपण आता कायमसाठी भूमिहीन होणार या भितीने गोंडपिंपरी तालुक्यातील बारा गावांतील शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. काहीही झाले तरी आम्ही आमची शेती देणार नाही, अशी आक्रमक भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे..चंद्रपूर जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या गोंडपिंपरी तालुक्यातील करंजी येथील एमआयडीसीच्या माध्यमातून दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केलेला प्रकल्प उभारण्यात येणार आहे. दरम्यान या प्रकल्पाकरिता दहा हजार एकर शेती अधिग्रहीत करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी हडपण्याचा हा डाव आहे..Jalna Nanded Highway: जालना-नांदेड महामार्गाचे भूसंपादन तातडीने पूर्ण करा.आम्हाला उद्योग नकोच, आमची शेतीच आम्हाला हवी आहे, अशी भूमिका बारा गावातील शेतकरी बांधवांनी घेतली आहे. सुरजागड, कोनसरी येथील प्रकल्पाने तेथील शेतकरी बांधवांची झालेली फसवणूक आम्ही बघत आहोत. अशी चूक कुठल्याही स्थितीत आम्ही करणार नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे..संबंधित जागा अधिग्रहण करण्याच्या प्रक्रियेची शेतकरी बांधवांना शेवटच्या क्षणापर्यत माहिती दिली गेली नाही. अचानकपणे ही माहिती समोर आल्यानंतर शेतकऱ्यांना मोठाच धक्का बसला. या प्रकल्पामुळे बारा गावातील हजारो शेतकरी भूमिहीन होणार आहेत.हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या जिवाशी उठला आहे. अशात आता शेतकऱ्यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतली आहे..अधिग्रहणाच्या प्रक्रियेला ९० दिवसांचा कालावधी अपेक्षित असताना केवळ ३० दिवसांच्या कालावधीत ही प्रक्रिया गुंडाळण्याचा अट्टाहास प्रशासनाकडून केल्या जात आहे. हा अतिशय अन्यायकारक प्रकार असून आम्ही कुठल्याही स्थितीत आमची शेती देणार नसल्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. या वेळी राजेश कवठे, शालीकराम माउलीकर, कमलेश निमगडे, ॲड. सचिन फुलझेले, शंकर पाल, राहुल सोनटक्के, मारोती पाटील भोयर यांच्यासह हजारो शेतकरी उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.