गडकरी काय म्हणाले?शेतमालाचे भाव हे जागतिक घटकांवर अवलंबूनदेशातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालास योग्य भाव मिळत नाहीशेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे.India Agriculture : शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालास योग्य भाव मिळत नाही. कारण शेतमालाचे भाव हे जागतिक घटकांवर अवलंबून असतात. त्यामुळे सरकारने अशा शेतकऱ्यांना मदत करण्याची आवश्यकता आहे, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी बुधवारी (दि. २४ सप्टेंबर) व्यक्त केले. .'दुसऱ्या इंडिया बायो-एनर्जी अँड टेक एक्स्पो'मध्ये संबोधित करताना ते म्हणाले की, साखरेचा भाव ब्राझील, तेलाचा भाव मलेशिया, मक्याचा भाव अमेरिकेवर अवलंबून आहे. तर सोयाबीनचे भाव अर्जेंटिनामुळे प्रभावित होतात..Paddy Crop Damage: परिपक्व झालेले भातपीक नुकसानीच्या उबंरठ्यावर."जागतिक अर्थव्यवस्थेच्या या परिस्थितीत कृषी उत्पादनांना योग्य भाव मिळत नसल्याने देशातील ग्रामीण आणि आदिवासी भागात गरिबी आणि बेरोजगारीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे," असे गडकरी म्हणाले..भारतातील ६५ टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. देशाच्या जीडीपीमध्ये कृषी क्षेत्राचे योगदान केवळ १४ टक्के आहे. अशा परिस्थितीत, आपली ग्रामीण भागातील शेती आणि आदिवासी अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी आपल्याला शेतीला आधार देण्याची गरज आहे. जी ग्राहकांसाठी, देशासाठी आणि तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे," असे त्यांनी नमूद केले..जेव्हा सरकारने मक्यापासून बायो-इथेनॉलचे उत्पादन घेण्यास मंजुरी दिली; तेव्हा मक्याचा भाव प्रति क्विंटल १,२०० रुपयांवरुन २,८०० रुपयांवर गेला, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. .Agrowon Podcast: हरभरा दरात चढ उतार; कापूस भाव कमीच, सोयाबीनचे भाव दबावातच, हळदीचे दर स्थिर, आल्याचे दर टिकून."शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालास चांगला भाव मिळत नाही. त्यामुळे त्यांना अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत होते," असेही त्यांनी नमूद केले..कृषीचे विविधीकरण का गरजेचे आहे?ते पुढे म्हणाले, ''शेतकऱ्यांना मक्यापासून इथेनॉल निर्मितीतून अतिरिक्त ४५ हजार कोटी रुपये मिळाले. म्हणूनच, ऊर्जा आणि वीज क्षेत्राच्या दिशेने कृषीचे विविधीकरण करणे ही देशाची गरज आहे. देशात पर्यायी इंधन आणि जैवइंधनाला भविष्यात मोठा वाव आहे.''.सध्या, आपण ऊर्जेचे आयातदार आहोत. त्यासाठी असा दिवस यायला हवा; जेव्हा आपण ऊर्जेचे निर्यातदार होऊ आणि ती देशासाठी सर्वात महत्त्वाची अशी ऐतिहासिक कामगिरी ठरेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. .भारतातील हवा प्रदूषणाबद्दल बोलताना गडकरी म्हणाले की, ४० टक्के हवा प्रदूषण वाहतूक इंधनामुळे होते. ही देशासाठी, विशेषतः राजधानी दिल्लीतील एक मोठी गंभीर समस्या आहे. आम्ही देशातील प्रदूषण कमी करण्यासाठी काम करत आहोत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.