Special Diesel Distribution Policy: ‘‘या हंगामात शेतकरी कॅनमध्ये डिझेलची मागणी करीत आहेत. साधारणपणे आपण अशा प्रकारे डिझेल देत नाही. पण या हंगामात आपण शेतकऱ्यांना त्या पद्धतीने देत आहोत. मात्र शेतकऱ्यांच्या नावाने कोणी साठेबाजी करू नये, या दृष्टीने जिल्हा प्रशासनाला आदेश दिले असून, ते प्रयत्न करीत आहेत,’’ अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केली..‘गेल्या १० दिवसांत इंधन दरांत सात रुपयांनी वाढ झाली आहे. हा थेट नागरिकांच्या खिशावर टाकलेला दरोडा नाही काय?’ अशी टीका काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली होती. मुंबईत सोमवारी (ता. २५) पत्रकारांशी बोलताना त्यांनी वडेट्टीवारांच्या टीकेला उत्तर दिले. तसेच सध्याच्या परिस्थितीवर त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली..Fuel Supply: शेतकऱ्यांसाठी डिझेल उपलब्ध करून देण्याच्या सूचना : देवेंद्र फडणवीस.‘‘आपल्याला माहित आहे, की सध्या जागतिक संकट आहे. जागतिक संकटात पुरवठा साखळी विस्कळीत झाली असताना अनेक देशांनी पेट्रोल- डिझेलची आणीबाणी घोषित केली. काही ठिकाणी दोन-दोन दिवस लॉकडाऊन आहे. अशाही परिस्थितीत आम्ही पेट्रोल देण्याचा प्रयत्न करत आहोत. काही ठिकाणी लोक मोठ्या प्रमाणात जमा झाल्याने कायदा- सुव्यवस्थेची परिस्थिती तयार झाली,’’ असे फडणवीस म्हणाले..Buldhana Fuel Stock Availability: बुलडाणा जिल्ह्यात पेट्रोल, डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध : मंत्री मकरंद पाटील .‘‘जेवढा कोटा मागील वर्षी आपल्याकडे होता. जवळपास तेवढाच कोटा आहे. इंधन पुढे मिळेल की ही थोडी भीती असल्यामुळे मागणी २० टक्क्यांनी वाढली. पुरवठ्यावर ताण येईल, अशाप्रकारे कोणीही साठेबाजी करू नये. परिस्थिती नियंत्रणाचा आणण्याचा प्रयत्न चालला आहे. काही ठरावीक गावांमध्ये जास्त हिंसक पद्धतीची प्रवृत्ती दिसत आहे. तेथे पोलिसांना सांगितले की, जे कोणी विनाकारण हिंसा करत असतील, त्यांच्यावर कारवाई करावी,’’ असे फडणवीस यांनी सांगितले..पंतप्रधान मोदींच्या १२ वर्षांत बहुतांश काळ महागाईचा निर्देशांक सर्वांत खाली होता. जागतिक परिस्थितीमुळे काही प्रमाणात जगात महागाई वाढत आहे, त्याची झळ आपल्यालाही पोहोचत आहे. त्यावर निश्चितच पंतप्रधान मोदी उपाय काढतील.देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.