Crop Procurement Delay: गोंदिया जिल्ह्यातील धान खरेदी प्रक्रियेत उद्भवलेल्या अडचणींमुळे हमीभावाने धान विक्रीपासून वंचित राहिलेल्या हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासंदर्भात प्रशासनाकडून शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. .माहितीनुसार, यंदाच्या हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रांवर विक्री करण्यासाठी सुमारे १ लाख ३२ हजार ६४५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी केवळ ८२ हजार २७३ शेतकऱ्यांची धान खरेदी करण्यात आली असून, जवळपास ५० हजार शेतकरी विक्रीपासून वंचित राहिले आहेत. या कालावधीत अंदाजे २७ लाख १२ हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आले..MSP Procurement : केंद्र सरकारने हमीभाव खरेदीची जबाबदारी राज्यांवर टाकू नये; तेलंगणाच्या कृषिमंत्र्यांची मागणी.सध्या बाजारपेठेत धानाला १,६०० ते १,९०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत असताना, शासनाचा हमीभाव २,३४५ रुपये प्रति क्विंटल आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांना कमी दरात धान विक्री केली आहे..यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. गत हंगामातील धान उत्पादकांना बोनस जाहीर करण्यात आलेला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. जिल्ह्यातील १ लाख ३२ हजार शेतकरी बोनससाठी पात्र आहेत..MSP Farmer Issue: भंडाऱ्यातील ७७ हजार शेतकरी हमीभावापासून वंचित .मळणीचा प्रश्न गंभीरधान खरेदीनंतर मळणी (प्रोसेसिंग) प्रक्रियेतही अडचणी निर्माण झाल्या आहेत. राईस मिलर्ससोबतचे करार, साठवणूक व्यवस्था आणि वाहतूक खर्च यामुळे प्रक्रिया मंदावली आहे. परिणामी, मोठ्या प्रमाणावर धान साठा प्रलंबित असल्याची माहिती समोर येत आहे. एकूणच, हमीभाव, बोनस आणि खरेदी व्यवस्थेतील त्रुटीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले असून, शासनाच्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.