Ghatne Barrage Project : घाटणे बॅरेज प्रकल्प: हक्काच्या जमिनीसाठी शेतकऱ्यांची पुन्हा मोजणी करण्याची मागणी
सोलापूर कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत घाटणे बॅरेजच्या बुडीत क्षेत्रात बाधित होणाऱ्या भोयरे, घाटणे आणि दाईगडेवाडी येथील शेतजमिनींची आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून फेरमोजणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी संबंधित पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.