Nashik News : शेतीमध्ये नवनवीन प्रयोग आणि तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी परदेश अभ्यास दौरे आयोजित केले जातात. मात्र या दौऱ्याचा खर्च ४.२० लाख रुपयांवर गेला असूनही अनुदानाची मर्यादा १ लाखच आहे. .शेतकऱ्यांचा आर्थिक भार लक्षात घेऊन अनुदानाची मर्यादा वाढवून परदेश अभ्यास दौरे तातडीने पुन्हा सुरू करावे, अशी मागणी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे. तर कृषी आयुक्त सूरज मांढरे यांची भेट घेत याकडे लक्ष वेधल्याची माहिती नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी दिली..Farmers Study Tour : मुळशीतील शेतकऱ्यांचा सातारा, कोल्हापुरात अभ्यास दौरा.परदेश दौऱ्यांच्यासंदर्भात आमदार तांबे यांच्याकडे अनेक शेतकऱ्यांनी कैफियत मांडली होती. त्यावर गत पावसाळी अधिवेशनामध्ये राज्यातील शेतकऱ्यांच्या परदेश अभ्यास दौऱ्याच्या आयोजनाबाबतचा मुद्दा विधान परिषदेमध्ये उपस्थित केला होता. .त्यानंतर कृषी आयुक्तालयामार्फत २०२५-२६ साठी योजना पारदर्शक व नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्याचा निर्णय झाला. मात्र दौऱ्यासंबंधी अनुदानात गेल्या १२ ते १५ वर्षांपासून कोणतीही वाढ झालेली नसल्याचे निदर्शनास आणून दिले आहे..Farmers Study Tour : शेतकरी विदेश दौरे अचानक रद्द.शासनाकडून परदेश दौऱ्यासाठी अनुदान म्हणून एकूण खर्चाच्या ५० टक्के किंवा १ लाख रुपये यापैकी जे कमी आहेत ते दिले जात होते. २०२५-२६ मध्ये परदेश दौऱ्याचा खर्च सुमारे ४ लाख २० हजार रुपये इतका झाला. मात्र असे असताना शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानाच्या रकमेतील काहीही वाढ झालेली नाही. .शेतकऱ्यांना जास्तीतजास्त एक लाख रुपये अनुदान मिळते.परिणामी शेतकऱ्यांवरील आर्थिक भार तिपटीने वाढलेला आहे. सध्या परदेश दौऱ्यासंदर्भात अर्ज प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे लवकर अनुदानाची मर्यादा वाढून आवश्यक ती कार्यवाही करण्याची मागणी केली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.