Farmers Protest: वाढता उत्पादन खर्च आणि शेतीतील मजूरटंचाईमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडत असून, एचटीबीटी कापूस बियाणे तंत्रज्ञानाला शासनाने तातडीने मान्यता द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली. या मागणीसाठी शेकडो शेतकऱ्यांनी मोटारसायकल रॅली काढत दिग्रस तहसील कार्यालयावर धडक दिली. तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले..निवेदनात म्हटले आहे, की यवतमाळ जिल्ह्यात खरीप हंगामात कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद आदी पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. मात्र तण नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणावर मजुरांची गरज भासत असून, सध्या मजूर टंचाई गंभीर बनली आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ होत आहे..Cotton Farmers Demand: बीटी कपाशीस हेक्टरी लाखाची मदत करा.शेतकरी संघटनेच्या मते, एचटीबीटी तंत्रज्ञानामुळे तणनाशक फवारणी अधिक प्रभावीपणे करता येते. पारंपरिक पद्धतीत वारंवार निंदण करावे लागत असल्याने मजुरी खर्च वाढतो, तर एचटीबीटी तंत्रज्ञानामुळे हा खर्च कमी होऊन शेती व्यवस्थापन सुलभ होते..Farmers Demand: लोखंडी बैलगाडीला ७० टक्के अनुदान देण्याची मागणी.जिल्ह्यातील अनेक भागांत शेतकरी गेल्या काही वर्षांपासून अनधिकृतरीत्या एचटीबीटी बियाण्यांचा वापर करीत असून त्यातून उत्पादन व खर्च नियंत्रणात सकारात्मक परिणाम दिसून आल्याचा दावाही निवेदनात करण्यात आला आहे..आधुनिक तंत्रज्ञानाची गरज लक्षात घेऊन शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करावा आणि एचटीबीटी कापूस बियाण्यांना अधिकृत मान्यता द्यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. या वेळी दीपक आनंदवार, मिलिंद दामले, विजय निवल, राजेंद्र झोटिंग, देवेंद्र राऊत यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.