Central Inspection Team Visits Update: ‘‘यंदा पावसानं दडी मारली अन् खरिपातली बाजरी, मूग, उडीद, सोयाबीन जागच्या जागी खाक झालं. पाणी न्हाई, जनावरांच्या चाऱ्याची टंचाई झाली हाय. जनावरं अन् माणसांना जगणं मुश्कील होईल अशी परिस्थिती हाय. आता पाऊस पडण्याची बी शक्यता दिसत न्हाई. .साहेब, तुम्ही सरकारला सांगा, हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत द्यायची शिफारस करा,’’ अशी विनवणी शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकाकडे केली. पथकातील अधिकाऱ्यांनीही चारा, पाणी, पिकांची स्थिती, झालेला खर्च आणि उत्पादन याबाबत माहिती जाणून घेतली.Drought Panchanama Rule: पंचनाम्यात दोन साक्षीदारांची अट म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा : बाळासाहेब थोरात.दुष्काळाच्या तीव्रतेची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी (ता. ९) डॉ. के. पुन्नासामी, सुमित शर्मा आणि अफसर अहमद खान यांच्या केंद्रीय पथकाने चास, निमगाव घाणा (ता. अहिल्यानगर), टाकळी खांडेश्वरी, चिंचोली आणि वालवड (ता. कर्जत) येथे पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला..Drought Protest: दुष्काळाच्या मुद्यावर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे विहिरीत आंदोलन.या वेळी प्रभारी जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, कृषी आयुक्त सूरज मांढरे, विभागीय कृषी सहसंचालक काटकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, कृषी विकास अधिकारी सुधीर शिंदे, प्रदीप लाटे, प्रांताधिकारी सुधीर पाटील, नितीन पाटील, तहसीलदार मिलिंद कुलथे, रवी सतवन, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, कृषी उपसंचालक सागर गायकवाड उपस्थित होते..चास आणि निमगाव घाणा येथे शेतकऱ्यांनी पथकापुढे आपल्या व्यथा मांडल्या. पथकातील अधिकाऱ्यांनी चास येथे अनिल गवळी यांच्या उडीद पिकाची, तसेच विठ्ठल गवळी, पोपट गवळी, भिकाजी सहादू देवकर, अनिल देवकर आणि श्रीपती देवकर यांच्या बाजरी, तूर व कांदा पिकांची पाहणी केली. तसेच निमगाव वाघा शिवारातील तलावाची पाहणी केली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.