Amravati News: शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती आणि शेतीमालाला हमीभाव या मागण्यांच्या पूर्ततेसाठी नागपूर येथे २८ ऑक्टोबर रोजी आंदोलन केले जाणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून सोडणारे हे आंदोलन असेल, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी या वेळी दिला. आंदोलनाच्या पुढील टप्प्यात महिलांची निर्णायक भूमिका राहील, असेही त्यांनी सांगितले..बेलोरा येथे गुरुवारी (ता. १८) सायंकाळी आयोजित शेतकरी, शेतमजूर, महिला सभेत श्री. कडू बोलत होते. या वेळी संयुक्त किसान मोर्चाचे प्रवक्ते राकेश टिकैत, ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ, डॉ. अशोक ढवळे, महादेव जानकर, डॉ. अजित नवले, बिजू कृष्णन, युद्धवीर सिंग, तेजिंदरसिंग विर्क यांच्यासह देशभरातील शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते..Farmer Protest: पाणी भरलेल्या सोयाबीन शिवारात शेतकऱ्याचे आंदोलन.श्री. टिकैत म्हणाले, सरकार कितीही मुजोर असले तरी संघटनात्मक शक्तिपुढे त्याला झुकणे क्रमप्राप्त ठरते. याच एकीच्या बळावर आम्ही दिल्ली सीमेवर लढा देत ‘हम करे सो कायदा’ धोरण अवलंबिणाऱ्यांना झुकवित शेतकरी विरोधी कायदे मागे घेण्यास भाग पाडले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनीदेखील असाच लढवय्या बाणा अंगी बाळगावा, त्याला बळ देण्याचे काम संयुक्त किसान मोर्चा करेल, असा विश्वास यांनी व्यक्त केला..Onion Farmers Protest: कानगाव येथे कांदा उत्पादकांचे बेमुदत धरणे.ते म्हणाले, ‘‘सिंचनाचा अभाव, शेतीमालाला हमीऐवजी कमी भाव, कोरडवाहू क्षेत्राची घटती उत्पादकता अशी शेतीक्षेत्रासाठी नैराश्याची अशी अनेक कारणे आहेत. त्यातूनच विदर्भ, मराठवाड्यात आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. परंतु तुमचा जीव गेला तरी निगरगट्ट शासनकर्त्यांवर त्याचा कोणताच परिणाम होत नाही. उलट तुमच्या कुटुंबाला याची सर्वाधिक झळ पोचते. परिणामी आता व्यवस्थेला कंटाळत आत्महत्या न करता व्यवस्थेविरोधात लढा उभारा.’’.मागण्या मान्य करून घ्यावयाच्या असल्यास आपल्या पातळीवर शासकीय कार्यालय निवडत तेथेच मुक्काम करा. जसे जमेल त्याप्रमाणे आंदोलन करण्याची भूमिका घेतली तर सरकार निश्चित वठणीवर येईल, असा विश्वास श्री. टिकैत यांनी या वेळी व्यक्त केला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.