Pavasacha Khand: यंदा मॉन्सून जूनमध्ये उशिराने दाखल झाला. यामुळे बागायती कपाशीव्यतिरिक्त अन्य खरीप वाणांच्या पेरण्या लांबणीवर पडल्या. जुलैच्या पहिल्या टप्प्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी ९२ टक्के पेरण्या झाल्या असल्याची माहिती कृषी विभागाने दिली..जिल्हाभरात पावसाने आतापर्यंत विश्रांती घेत मोठा खंड दिला आहे. त्यामुळे उगवण झालेली रोपे पावसाअभावी कोमेजत असून चुवा पद्धतीने पाणी देत पिके वाचविण्याची धडपड शेतकरी करीत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात मॉन्सूनचे सरासरी पर्जन्यमान ६६३.३३ मिलिमीटर निर्धारित आहे. यावर्षी मे दरम्यान मॉन्सूनपूर्व पाऊस देखील झाला नसून ‘एल निनो’च्या प्रभावाने मॉन्सून उशिराने दाखल झाला..Kharif Crop Management : पावसाचा खंड पडल्यास पिकांचे नियोजन कसे कराल?.जुलैत ५ दिवस पावसाचेजून महिन्याचे सरासरी पर्जन्यमान १२३.७ मिलिमीटर असून जूनच्या २३ दिवसांपैकी केवळ ७ दिवसांत सरासरी ८४.७ मिलिमीटर अर्थात ६८.०५ टक्के पावसाची नोंद असून तब्बल ३२ टक्के तूट आहे. जुलैत सरासरी १८९.२ मिलिमीटर पाऊस अपेक्षित असून ९ जुलैपर्यंतच सरासरी ८९.१ मि.मी. (जेमतेम ४७ टक्के) पाऊस झाला असून त्यानंतर पावसाने दडी मारली आहे..ढगाळ वातावरणजळगाव जिल्ह्यात दुपारपर्यंत ४० अंश सेल्सिअस इतके तप्त उन्ह होते. गेल्या दोन, तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणासह उष्ण व दमट हवेमुळे अंकुरलेली रोपे कोमजत आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग बादली, हंडा, ग्लास वा अन्य साहित्य घेत पिकांना जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत..Nagpur Agriculture News: पावसाअभावी पेरण्यांचा वेग मंदावला.असा आहे अंदाजजिल्ह्यात लागवडीखाली पेरणीलायक क्षेत्रापैकी ७ लाख ४० हजार ५३६ हेक्टर क्षेत्रावर खरीप पीक लागवडीचा अंदाज होता. जून अखेर ४५ टक्के तर १७ जुलैदरम्यान आतापर्यंत ६ लाख ७७ हजार ७७३ हेक्टर (९२ टक्के) क्षेत्रावर खरीप वाणांची लागवड झाली आहे..कपाशीत सव्वालाख हेक्टरवर घटसर्वाधिक लागवड मका एक लाख ६० हजार ३१९.१० (१७३ टक्के), सोयाबीन ३९ हजार ९७१ (२०५ टक्के), तूर २७ हजार ६८० (२३२.१८ टक्के), उडीद १३ हजार ३१०.४५ (८२.२६ टक्के), मूग १४ हजार ३३३ (८०.२२ टक्के), ज्वारी ७ हजार ३८८ (जेमतेम ३१ टक्के), बाजरी ३ हजार ३५० (४३ टक्के), भूईमूग ७९ टक्के, सूर्यफूल १६ हेक्टर अशी लागवड आहे..शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हटले जाणारे कपाशीचा पेरा ५ लाख ४६ हजार ९३३ हेक्टरवर लागवडीचा अंदाज होता. मात्र यंदा केवळ ४ लाख ९ हजार ३५३.१५ हेक्टर (जेमतेम ७५ टक्के) लागवड झाली. एक लाख ४० हजार हेक्टर २५ टक्के कमालीची घट झाली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.