Solapur News: ‘‘शेतकऱ्यांनी संघटित होऊन आधुनिक पायाभूत सुविधा उभारणे, हे ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी अत्यंत आवश्यक आहे.विठ्ठलगंगा फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीने सुरू केलेला हा उपक्रम केवळ या परिसरासाठीच नव्हे, तर इतर भागांसाठीही मार्गदर्शक ठरेल,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांनी केले..माढा तालुक्यातील निमगाव (टें.) येथे विठ्ठलगंगा फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात येणाऱ्या २००० टन क्षमतेच्या अत्याधुनिक कोल्ड स्टोरेज प्रकल्पाचे भूमिपूजन डॉ. आमटे यांच्याहस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे संचालक डॉ. राजीव मराठे होते, तर रॅमन मॅगसेसे पुरस्कारार्थी डॉ. सौ. मंदाकिनी आमटे यांची प्रमुख उपस्थिती होती..Farmer Empowerment: शेतकऱ्यांना मार्केटपर्यंत पोहोचविणे आवश्यक : डॉ. सिंग .या वेळी मार्गदर्शन करताना डॉ. आमटे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथे आदिवासी समाजासाठी सुरू असलेल्या आरोग्य व शिक्षण कार्याचा प्रवास उलगडला. ते म्हणाले, की समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवायचा असेल, तर सेवाभाव आणि सातत्य महत्त्वाचे आहे. विठ्ठलगंगा कंपनीने शेतकरी हितासाठी हाती घेतलेल्या नावीन्यपूर्ण प्रयोगांचे त्यांनी विशेष कौतुक केले..Farmer Empowerment: तंत्रज्ञानातून आपला शेतकरी मजबूत होणार.कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. राजीव मराठे यांनी डॉ. आमटे यांच्या कार्याचा गौरव करतानाच, विठ्ठलगंगा कंपनीचे अध्यक्ष धनराज शिंदे यांच्या तरुण वयातील सामाजिक जाणिवेचे कौतुक केले..प्रास्ताविक करताना शिंदे म्हणाले, ‘‘या कोल्ड स्टोअरेजमुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाची सुरक्षित साठवणूक होईल. बाजारभाव मिळेपर्यंत माल टिकवून ठेवता आल्याने शेतकऱ्यांचे नुकसान टळेल आणि पर्यायाने उत्पन्नात वाढ होईल, हा आमचा उद्देश आहे.’’ कार्यक्रमाचे आभार नितीन कापसे यांनी मानले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.