Satara News : फसवणूक झालेल्या शेतकऱ्याचा मुद्देमाल जप्त करण्यात फलटण शहर पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी मोहम्मद मुस्ताक मोहम्मद हुसेन (वय ३८, रा. वासावी, जि. चित्रदुर्ग, कर्नाटक) व इदमा हबीब रेहमान कुंजी बियारी (वय ६४, रा. अहुर, जि. दक्षिण कन्नडा, कर्नाटक) यांना अटक करण्यात आली आहे. .त्यांच्या ताब्यातून दोन ट्रॅक्टर, एक पोकलेन असा एकूण ६५ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याची फिर्याद विनय संपत माने (वय २६, रा. गोंदवले बुद्रुक, ता. माण) यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की विनय माने यांनी फेसबुकद्वारे ट्रॅक्टर भाड्याने दिले जातील, अशी जाहिरात दिली होती. .Financial Fraud: जिनिंग व्यावसायिकाचा ५१ लाख रुपयांच्या चुकाऱ्यास नकार .त्यानंतर कर्नाटकातील मोहम्मद मुस्ताक मोहम्मद हुसेन याने विनय माने यांना आमच्याकडे राष्ट्रीय महामार्गाचे सरकारी काम असल्याचे भासवून त्यांच्याकडून दोन ट्रॅक्टर व एक पोकलेन भाड्याने करार करून कर्नाटक येथे घेऊन गेले होते. त्यानंतर विनय माने यांनी ठरल्याप्रमाणे भाडे घेण्यासाठी संपर्क साधला असता, संशयिताने त्याचा मोबाइल बंद केला. त्यानंतर त्याने दिलेला पत्ता व सरकारी कामाची वर्कऑर्डर खोटी असल्याचे लक्षात आले..Farmer Fraud: ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेत शेतकऱ्याची फसवणूक .दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्या आदेशाने फलटण शहर पोलिसांच्या पथकाने संशयिताचा कर्नाटक, महाराष्ट्र, मुंबई या ठिकाणी शोध घेतला. त्यामध्ये संशयित मुस्ताक हुसेन यास नायगाव (मुंबई) येथून ताब्यात घेतले असून, त्याने साथीदार इदमा हबीब रहेमान कुंजी बियारी (रा. कर्नाटक) यांनी विनय माने यांच्याकडून ट्रॅक्टर व पोकलेन घेऊन खोट्या कागदपत्राच्या आधारे दुसऱ्या राज्यात विक्री केल्याचे निष्पन्न झाले. .यावरून संशयित इदमा हबीब रहेमान कुंजी बिहारी यास कर्नाटक राज्यातून ताब्यात घेऊन गुन्ह्यातील फसवणूक करून नेलेले ट्रॅक्टर व पोकलेन तमिळनाडू राज्यातून हस्तगत करण्यात आले आहेत. सरकारी कामाच्या खोट्या वर्कऑर्डर दाखवून शेतकऱ्यांकडून वस्तू घेऊन दुसऱ्या राज्यात विकणारी आंतरराष्ट्रीय टोळी कार्यरत आहे..कारवाईत पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, पोलिस उपअधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा, पोलिस उपनिरीक्षक विजयमाला गाजरे, सहायक पोलिस उपनिरीक्षक संतोष कदम, अंमलदार पूनम बोबडे, काकासाहेब कर्णे, अतुल बडे, जितेंद्र टिके यांनी सहभाग घेतला. अंमलदार पूनम बोबडे तपास करीत आहेत. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.