Canal Block: दक्षिण सोलापूर तालुक्यातील सादेपूर परिसरात उजनीचे पाणी येत नसल्याने काही शेतकऱ्यांनी दीड किलोमीटरचा कालवा बुजवला. मात्र, यंदाच्या अतिवृष्टीत तोच कालवा फुटून शेती आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले असून, पाटबंधारे विभागाने आता आठ शेतकऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत.