Jalgaon News: हिवाळ्यात शेतात मुबलक पाणी असल्याने भाजीपाल्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात निघते. त्यामुळे हिवाळ्यात भाजीपालाचे दर कमी होतात. मात्र, शेतकऱ्यांना पालेभाजी लागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च लागत असतो..त्यात विविध बाजारात भाज्या विक्रीसाठी आल्यानंतर भाव कमी होतात. कमी भावातच भाजीपाला विक्री करावा लागतो. त्यामुळे केवळ येण्याजाण्याचा खर्च निघतो, अशी भावना भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केल्या..Farmer Issue: सावकारी कर्ज घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊ नये.शहरातील भाजी बाजारात सध्या पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे. विक्रेत्यांकडे विशेषतः शेतकरी विक्रेत्यांकडे भाज्या घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. यात मेथी, टोमॅटो, फ्लॉवर, पालक, मुळा, पोकळा यासह फ्लॉवर, पत्ताकोबी आदी भाज्यांचे दर १० रुपये किलोपासून ते ३० रुपयांपर्यंत झालेले आहे..Farmer Issue: शेतकऱ्याच्या मृत्यूनंतरही कुटुंबाची फरपट कायम.महिना दीड महिन्यापूर्वी २० ते २५ रुपयाला मिळणारी मेथीची जुडी आता १० ते १५ रुपयांत ती देखील दोन जुड्या मिळत आहे. तर ४० रुपये किलो प्रमाणे विकले जाणारे टोमॅटो आता १० रुपये किलो मिळत आहेत. तसेच कोथिंबिरीची ५० ते ६० रुपये मिळणारी जुडी आता तर १० रुपयांना दोन जुड्या मिळत आहे..मेथीचे उत्पादन घेण्यासाठी येणाऱ्या खर्चाचा शेतकऱ्यांकडून अंदाज घेतला असता, शंभर मेथीच्या जुडीला शेतात लागणारा साधारणतः ३०० ते ४०० रुपये खर्च येतो. शेतातून बाजारात विक्रीसाठी आणण्याकरिता ३०० रुपये असा एकूण सुमारे ६०० ते ७०० रुपये खर्च होतो..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.