Yavatmal News: राज्यात संकरित बीटी कापूस बियाण्याच्या तथाकथित पुनर्प्रमाणीकरणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे. या प्रक्रियेस तत्काळ बंदी घालावी, अशी मागणी शेतकरी संघटना तंत्रज्ञान व कृषी विज्ञान विस्तार आघाडी, महाराष्ट्राचे राज्य समन्वयक मिलिंद दामले यांनी कृषी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे..या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे, की उप आयुक्त (बियाणे), कृषी व शेतकरी कल्याण विभाग यांनी खासदार संजय देशमुख (यवतमाळ-वाशीम लोकसभा) यांना ३ नोव्हेंबर २०२५ रोजी पाठवलेल्या अधिकृत पत्रात बियाणे उत्पादकांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचे स्पष्ट केले आहे..BT Cotton Seeds : धुळे जिल्ह्यात बीटी कापुस बियाणांच्या अकरा लाख पाकिटांची मागणी.या पत्रामुळे बीटी कापूस बियाण्यांच्या गुणवत्तेवर आणि प्रमाणिकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बियाणे अधिनियम १९६६ व बियाणे नियम १९६८ नुसार प्रत्येक प्रमाणित बियाण्याच्या पाकिटावर चाचणी तारीख आणि गुणवत्तेस जबाबदार व्यक्तीचे नाव व पत्ता असणे बंधनकारक आहे..मात्र प्रत्यक्षात अनेक संकरित बीटी कापूस बियाण्यांच्या पाकिटांवर ही माहिती दिली जात नाही. त्यामुळे बियाणे खराब निघाल्यास जबाबदारी कुणावर निश्चित करायची, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहतो..पुनर्प्रमाणीकरण म्हणजे कालबाह्य झालेल्या बियाण्यांची पुन्हा उगवण आणि भौतिक शुद्धतेची चाचणी करून त्यांना विक्रीयोग्य ठरवणे. मात्र या प्रक्रियेत बियाण्याची आनुवंशिक शुद्धता तपासला जात नाही. याच पळवाटीचा गैरफायदा घेत बियाणे उत्पादक कृषी केंद्रांकडून विक्री न झालेले जुने बियाणे परत घेतात आणि त्यावर नवीन वर्षाची पॅकिंग तारीख छापून पुन्हा बाजारात विक्री करतात. काही ठिकाणी नवीन व परत आलेले जुने बियाणे एकत्र मिसळून त्याची विक्री केली जात असल्याचेही समोर आले आहे. या फसवणुकीचा थेट परिणाम शेतात दिसून येत आहे..BT Cotton Seed : नफेखोरीसाठी बीटी कपाशी बियाण्यांचे बुकिंग.एकाच पाकिटातील बियाण्यांपासून उगवलेल्या कापसाच्या झाडांमध्ये प्रचंड तफावत आढळते. एकाच ओळीत काही झाडे उंच, मजबूत आणि भरघोस बोंड देणारी असतात, तर काही झाडे खुजी, कमजोर आणि कमी उत्पादन देणारी दिसतात. काही झाडांवर कीड व रोगांचा तीव्र प्रादुर्भाव आढळतो, तर बाजूचीच झाडे तुलनेने निरोगी असतात. कृषी तज्ज्ञांच्या मते ही स्थिती जनुकीय भेसळ आणि जोम कमी झालेल्या जुन्या बियाण्यांचे स्पष्ट लक्षण आहे..बियाणे कधीचे कळणे गरजेचेतांत्रिकदृष्ट्या बीटी कापूस बियाणे दीर्घकाळ साठवले असता त्यातील जैविक प्रक्रिया मंदावतात, रोपांची मुळांची वाढ कमी होते, अन्नद्रव्य शोषणाची क्षमता घटते आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे उत्पादन क्षमता मोठ्या प्रमाणावर घटते. याचा थेट फटका शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर बसतो. यात भर म्हणजे पाकिटावर ‘सीड प्रॉडक्शन इयर’ नमूद केले जात नाही. त्यामुळे ते बियाणे खरेच नवीन आहे की दोन–तीन वर्षांपूर्वीचे आहे, हे शेतकऱ्याला कळण्याची कोणतीही सोय नाही..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.