PM Crop Insurance Scheme: प्रधानमंत्री पीकविमा योजनेत रब्बी हंगामात पीकविमा योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे समोर आले आहे. यंदा २०२५-२६ रब्बी हंगामासाठी जिल्ह्यातील १४ तालुक्यांतून जेमतेम ५० हजार ७८८ शेतकऱ्यांनी पीकविमा संरक्षित केला असून, गेल्या वर्षी रब्बी हंगामात जिल्ह्यातून चार लाख ३६ हजार ५३१ शेतकऱ्यांनी विमा उतरविला होता.