Atapadi News : शेतीमाल व इतर मालवाहतुकीबरोबरच लहान-मोठ्या पशुधनाच्या सुरक्षित, संरक्षित वाहतुकीसाठी केंद्र शासनाने राज्यांच्या समवेत देशव्यापी ट्रान्स्पोर्ट सेवा सुरू करावी, अशी मागणी कुरेश कॉन्फरन्सचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी विभागाचे प्रदेशचे उपाध्यक्ष, शेतकरी साहित्य इर्जिक परिषदेचे प्रदेशचे उपाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार सादिक खाटीक यांनी केंद्र सरकारकडे केले आहे..यासंदर्भात त्यांनी केंद्र सरकारला निवेदन पाठवले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की पूर्वी पार्सल आणि माल वाहतूक सेवा एसटीच्या माध्यमातून दिली जात होती. प्रवासी वाहतुकीच्या एसटी बसेसमधून केली जाणारी पार्सल सेवा सध्या असली तरी एसटीचीच १० टनी मालवाहतुकीची ट्रकद्वारे सुरू असलेली सेवा सध्या बंद आहे. त्यामुळे कोट्यवधी नागरिकांना मालवाहतुकीसाठी खासगी सेवेवरच अवलंबून राहावे लागत आहे..महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायद्यामुळे मोठ्या पशुधनची वाहतूक करणे शेतकरी, पशुपालक आणि व्यापाऱ्यांना मोठ्या त्रासाचे होत आहे. गोरक्षक, पोलिस यंत्रणा, आणि इतरांकडून अडवणुकीचे प्रकार घडत आहेत. याचा सर्वांत मोठा फटका शेतकरी, पशुपालकांना बसत आहे. शेतकरी पशुपालकांनी एकमेकांना विकलेल्या अथवा खरेदी केलेल्या पशुधनाची वाहनातून वाहतूक करताना यामुळे गळचेपी होते..Agriculture Transport : ‘शेतकरी समृद्धी विशेष रेल्वे’ गाडीचा कालावधी वाढविण्याचा निर्णय.या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशातल्या सर्व राज्य सरकारांच्या मदतीने नव्याने माल आणि पशुधन वाहतुकीसाठी देशभर ट्रान्स्फोर्ट सुविधा सुरू करून शेती, शेतकरी, पशुपालकांसाठी त्यासंबंधीचे धोरण स्वीकारावे. यासाठी माल आणि पशुधन वाहतूक करणारी, प्रत्येक तालुका स्तरावर जनावर-माल वाहतुकीसाठीची बसस्थानकाच्या धर्तीवर ट्रक स्थानके निर्माण करावीत. तालुका, जिल्हा मार्गावर माल आणि जनावरांसाठीचे निवारा शेड उभारून या सेवेला ग्रामीण भारताशी जोडावे. .Agriculture Transport: शेतीमालाच्या दळणवळणाचे धोरण.तालुका स्तरावर कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या मार्केट यार्डात विक्रीसाठी आणली जाणारी आणि विक्रीनंतर खरेदीदारांच्या खेडे, गाव, शहरापर्यंत नेली जाणारी, रीतसर नोंदणी, परवानगीचेच पशुधन या नव्या वाहतुकीसाठी शासनमान्य ठरवावे. माल आणि जनावर वाहतुकीच्या शासनमान्य ट्रकना देशभर एकच आकार, एकच रंग आणि या वाहनांच्या चारही दिशेला दर्शविला जाणारा शासन मान्यतेची मोहोर या गाड्यांवर लावावी. या शासनमान्य गाड्या कोणीही अडवता कामा नये, अशी सुरक्षितता आणि कायदेशीर वैधता या माल आणि पशुधन वाहतुकीला दिली पाहिजे. देशभरात या वाहतुकीच्या गाड्यांना टोल फ्रीची सवलत असली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे..या निवेदनाच्या प्रति त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेस नेते राहुल गांधी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह खासदार प्रियांका गांधी-वड्रा, खासदार सुप्रिया सुळे यांना पाठविल्या आहेत..लहान पशुधन पालकांना व्यवसाय वाढीसाठी मदत शक्यलहान पशुधनाच्या (शेळ्या, मेंढ्या, बोकड, बकऱ्या, पाटी, लाव्हरे) वाहतुकीसाठी कोणतेही निर्बंध नसल्याने त्यांच्या वाहतुकीसाठी संरक्षित आणि सुरक्षित वाहतूक सेवा मिळाल्यास कोट्यवधी पशुधनाची वाहतूक सुलभ होऊ शकेल. तसेच या पशुधनाच्या वाहतुकीच्या वाहनधारकांकडून हजारो रुपये उकळणाऱ्या अनेक घटकांकडून होणारा त्रास या नव्या व्यवस्थेमुळे वाचू शकेल..या नव्या व्यवस्थेमुळे लहान पशुधनाच्या कोट्यवधी पशुपालकांना दुपटी-तिपटीने या व्यवसाय वाढीसाठी मदत होऊ शकेल. दर शंभर-दोनशे किमीवर रस्त्यालगत पिण्याच्या पाण्याचा हौद, १० गुंठ्यांचा विश्रांती सभागृहासाठी व्यवस्था करावी. नव्या शासन व्यवस्थेच्या धोरणात त्याचा समावेश करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.