Farmer Accident Scheme: शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान आता ‘डीबीटी’द्वारे
Gopinath Munde Yojana: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ आता ‘महाडीबीटी’ पोर्टलमार्फत थेट ऑनलाइन मिळणार आहे. तालुका कृषी अधिकाऱ्याने मंजूर केलेल्या अर्जावर शिक्कामोर्तब होणार असून, अनुदान थेट खात्यात जमा केले जाईल.