Nanded News: नांदेड जिल्ह्यात सततच्या दुष्काळाने अडचणीत आलेल्या शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. मागील वर्षात जिल्ह्यातील १६० शेतकऱ्यांनी मृत्यूला वटाळले आहे. मागील १२ वर्षांच्या काळात नांदेडमध्ये एकूण १७०६ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. २०१५ मध्ये सर्वाधिक १९० घटना समोर आल्या होत्या. .नांदेडमध्ये मागील सतरा वर्षांपासून शेतकरी आत्महत्या होत आहेत. यात २०१४ पासून वाढ झाली. सततचा ओला किंवा कोरडा दुष्काळ, कर्जाचा वाढणारा डोंगर यामुळे शेतकरी आत्महत्येचा मार्ग अवलंबत आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सतत चार वर्षे दुष्काळाशी सामना करावा लागला. कधी कोरडा दुष्काळ, तर कधी अतिवृष्टी. यातूनही चुकून समाधानकारक पाऊस पाणी झालेच, तर अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे हातातोंडाशी आलेली पिके वाया जातात..Farmer Death: दहा महिन्यांत ३७४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या.काही दिवसांच्या पावसातच महिनाभराची सरासरी गाठली जाते. यामुळे निसर्गावर अवलंबून असलेला शेतीचा हंगाम हातून जातो. यासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड होत नाही. यामुळे शेतकरी आत्महत्येचा मार्ग अवलंबत असल्याचे दिसून येत आहे. यासोबतच मागील काही वर्षांत शेतीमधील लागवड खर्चही वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट दिसून येत आहे. या कारणामुळेही शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे स्पष्ट होत आहे..वर्ष २०२५ मध्ये महिनानिहाय आकडेवारीनुसार एप्रिल, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात आत्महत्यांची संख्या तुलनेने जास्त नोंदली गेली. ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक २४ प्रकरणे समोर आली. दरम्यान, पात्र ठरलेल्या शेतकरी कुटुंबांना शासनाकडून आर्थिक मदत वितरित करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. यातील १२६ प्रकरणांमध्ये मदत रक्कम अदा करण्यात आलेली आहे..Farmer Death: दहा महिन्यांत राज्यात ८८८ शेतकरी आत्महत्या.४३ प्रकरणांची पडताळणी व प्रशासकीय कार्यवाही सुरू आहे. १० प्रकरणे अपात्र ठरली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.मागील १२ वर्षांच्या काळात नांदेडमध्ये एकूण १७०६ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. यात २०१५ मध्ये सर्वाधीक १९० प्रकरण घडले होते. जिल्ह्यात वाढत्या शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर शेती खर्च, कर्जबाजारीपणा, नैसर्गिक आपत्ती आणि बाजारभावातील चढ-उतार ही प्रमुख कारणे असल्याची चर्चा असून, प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्याची गरज व्यक्त होत आहे..नांदेडमध्ये १२ वर्षात १७०६ आत्महत्या२०१४ मध्ये ११८, २०१५ मध्ये १९०, २०१६ मध्ये १८०, २०१७ मध्ये १५३, २०१८ मध्ये ९८, २०१९ मध्ये १२२, २०२० मध्ये ७७, २०२१ मध्ये ११९ तर २०२२ मध्ये १४७, २०२३ मध्ये १७५, २०२४ मध्ये १६७ तर २०२५ मध्ये १६० घटना घडल्या आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.