Nanded News: नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे अधिकच अडचणीत भर पडल्याने जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येचा मार्ग अवलंबत आहेत. मागील आठ दिवसांत शेतकरी आत्महत्येच्या तीन घटना समोर आल्या आहेत. अर्धापूर तालुक्यातील येळेगाव येथील परमेश्वर नारायण कपाटे (वय २४) या तरुण शेतकऱ्याने शुक्रवारी (ता. ३) गळफास घेऊन आत्महत्या केली. .Farmer Death: सगंळ पैसं शेतात गेलं अन् पीक पाण्यात.नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूर येऊन शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाकडूनही अद्याप ठोस भरपाई मिळाली नसल्याने शेतकरी टोकाचे पाऊस उचलत आहेत. नांदेड तालुक्यातील वाहेगाव येथील पंडित सोनटक्के तसेच अर्धापूर तालुक्यातील कोंढा येथील निवृत्ती कदम यांनी आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर आठवडाही उलटत नाही अशातच अर्धपूरमधील येळेगाव येथे तिसरी घटना घडली..Farmers Death: धक्कादायक वास्तव! भारतात दर तासाला एक शेतकरी जीवन संपवतोय, सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्रात.दुधाचा व्यवसाय करणाऱ्या परमेश्वर कपाटे या तरुणाची म्हैस नुकत्याच आलेल्या पुरामुळे वाहून गेली. तसेच त्याच्या वडिलांकडे असलेल्या अडीच एकर शेतीतील सोयाबीन, कापूस पुराच्या पाण्यात पूर्णपणे बुडून गेले..यामुळे व्यथित झालेल्या परमेश्वर यांनी घराजवळ असलेल्या शेतातील झाडाला शुक्रवारी (ता. ३) सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. परमेश्वर यांच्या पश्चात आई-वडील, माधव व दिंगबर असे दोन भाऊ आहेत. परमेश्वर यांच्या खिशात चिठ्ठी सापडली आहे. त्यात सततची नापिकीमुळे व अतिवृष्टी, पूरपरिस्थितीमुळे यंदाही शेतीचे नुकसान झाले. बेरोजगारी तसेच कर्ज झाल्यामुळे आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी लिहिले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.