Malegaon News: निळगव्हाण (ता. मालेगाव) येथे एक शेतकऱ्याने आत्महत्या केली. येथील शेतकरी मनोहर सुखदेव पठाडे (वय ५२) यांनी चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. .बुधवारी (ता. १४) पहाटेच्या सुमारास मनोहर पठाडे हे नेहमीप्रमाणे शेतातील कांद्याच्या पिकाला पाणी भरण्यासाठी गेले होते. शेत (गट क्रमांक ११३/७) काष्टी शिवारातील चिंचेच्या झाडाला नायलॉन दोरीच्या साहाय्याने त्यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले..Farmer Death: दहा महिन्यांत ३७४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या.सकाळी उशिरापर्यंत ते घरी न परतल्याने कुटुंबीयांनी व ग्रामस्थांनी शोध घेतला असता ही धक्कादायक बाब उघडकीस आली. या घटनेची माहिती पोलिस पाटील अमोल संजय गांगुर्डे यांनी वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात दिली..Farmer Deaths: यवतमाळ जिल्ह्यात ३३४ दिवसांत ३४२ आत्महत्या.त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सहायक पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक ए. बी. नवले तपास करीत आहेत..त्यांच्या मागे पत्नी सुरेखा, मुलगा राहुल पठाडे व सैन्य दलातील विशाल ऊर्फ किरण पठाडे व विवाहित मुलगी माधुरी शेवाळे असा परिवार आहे. सणाच्या दिवशीच घडलेल्या या घटनेमुळे पठाडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात हळहळ व्यक्त होत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.