ChandrapurNews: दरूर (ता. गोंडपिंपरी) गावातील एका शेतकऱ्याने आपल्या अंगावर डिझेल टाकून स्वतः ला पेटवून घेतले. गंभीर अवस्थेत उपचारासाठी नागपूर येथे नेत असताना गुरुवारी (ता. ४) दुपारी त्यांचा मृत्यू झाला. नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. मात्र त्याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. मृत शेतकऱ्याचे नाव नामदेव सोनटक्के (वय ४२) असे आहे. .मिळालेल्या माहितीनुसार, नामदेव सोनटक्के हे गोंडपिपरी तालुक्याच्या सीमावर्ती भागातील दरूर या गावाचे रहिवासी होते. त्यांच्याकडे दहा एकर शेती होती. दोन मुले आणि पत्नी असा त्यांचा परिवार. चंद्रपूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. त्यामुळे शेतपिकाचे मोठे नुकसान झाले. यामुळे अनेक शेतकऱ्यांची मानसिकता बिघडली. बुधवारी (ता. ३) सोनटक्के यांनी आपल्या राहत्या घरी डिझेल अंगावर ओतून स्वतःला पेटवून घेतले. यानंतर ते पेटत्या अवस्थेत घराबाहेर पडले. अनेकांनी हा प्रसंग पाहिल्यावर आग विझविण्याचा प्रयत्न केला..Farmer Suicides: मराठवाड्यात मागील नऊ महिन्यांत ७८१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या! .पण तोपर्यंत आगीने उग्र रूप धारण केले होते. ते गंभीररीत्या भाजले गेले. त्यांना तातडीने चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॅाक्टरांनीत्यांना नागपूर येथे हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार नागपूर येथे पुढील उपचारासाठी नेत असतानाच वरोऱ्याजवळ त्यांचे निधनझाले..Farmer Suicide : चिंतन शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांचे.त्यांच्या निधनाची वार्ता समजताच गावावर शोककळा पसरली. त्यांनी स्वतःला नेमके कोणत्या कारणाने पेटवून घेतले याबाबत अद्याप स्पष्टता नसली असली तरी नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती त्यांच्या नातेवाइकांनी दिली. मिळू शकलीनाही. याबाबत आता पुढील तपास सुरू आहे..धाबा गावात पाच शेतकऱ्यांनी संपविले जीवनगोंडपिंपरी तालुक्यातील धाबा या गावातील पाच शेतकऱ्यांनी मागील दीड महिन्यांच्या काळात आत्महत्या केल्या. कर्ज, पिकांचे नुकसान या कारणांमुळे त्यांनी हा मार्ग पत्करला. यंदा खरीप हंगामात चांगला पाऊस असेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. सुरुवातीला चांगला पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या. मात्र, त्यानंतर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली. पुराच्या पाण्यात शेकडो हेक्टर क्षेत्रावरील पिके वाहून गेली. हातचे पीक गेल्याने कर्ज परतफेडीची चिंता शेतकऱ्यांना होती, या चिंतेतून दीड महिन्यात पाच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.