Amaravati News: शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत मिळण्यात ई-केवायसीसह याद्याच प्रशासनाकडून अपलोड झाल्या नसल्याचा अडथळा आहे. जिल्ह्यातील १ लाख ६८ हजार ५३३ शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर झाली असून ३३ टक्क्यांवर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ती मिळणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून शासनाकडे अद्याप या शेतकऱ्यांच्या याद्या पाठविण्यात आलेल्या नाहीत. त्याचप्रमाणे यामध्ये सप्टेंबरमधील नुकसानीची नोंदही नाही..जुलै व ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील १ लाख २३ हजार हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, मक्यासह फळपीक व भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. अपेक्षित पर्जन्यमानाच्या तुलनेत जिल्ह्यात पावसाची सरासरी या दोन महिन्यात कमी असली तरी तब्बल ३२ महसूल मंडलांतील अतिवृष्टीने पिकांची नासाडी झाली आहे..Amravati Low Rainfall: अमरावतीत पावसाचा खंड.जिल्हा प्रशासनासमवेत कृषी विभाग व जिल्हा परिषद यांनी केलेल्या संयुक्त पंचनाम्यांत १ लाख ६८ हजार ५३३ शेतकऱ्यांना फटका बसल्याचे व त्यांना मदतीसाठी १०८ .७१ कोटींच्या मदतीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. मदत निधी मंजूर झाला असला तरी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या अद्याप शासनाकडे अपलोड झालेल्या नाहीत. .त्यामुळे जाहीर झालेली मदत शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष खात्यात जमा होण्यासाठी प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे. मदतनिधी मिळवण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू असली तरी पोर्टलवर येत असलेल्या तांत्रिक अडचणींमुळे ती शक्य होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत..Amravati Politics : माजी राज्यमंत्री शिंदे गटाच्या वाटेवर.तालुकानिहाय नुकसानग्रस्त शेतकरी व मदतनिधी (कोटी रुपये)तालुका शेतकरी संख्या मदतनिधी (रु.)अमरावती २४,६२७ १७.१८तिवसा १४,८१९ १०.२०भातकुली ३४,२५३ १६.८५चांदूररेल्वे १९,५१० १३.४३.धामणगाव २१,१९४ १२.३९नांदगाव खंडे. १७,७१२ ११.३७अचलपूर ४३३ ०.११चांदूरबाजार ८०११ ८६.१२मोर्शी १०,२१९ ७६.२७.वरुड ६ ०.०६६दर्यापूर १६,८३५ १०५.८६अंजनगाव ५५५ ११.६१धारणी ६३ ०.०२३ चिखलदरा २९६ ०.२३.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.