Namo Shetkari Pending Installments: एकीकडे अग्रिम ५ हजार रुपयांची मदत देत असल्याचे सांगत सरकारने पाठ थोपटून घेतली. तर दुसरीकडे नमो शेतकरी महासन्मान योजनेचे दोन हप्ते थकवले. अशी सरकारची शेतकऱ्यांच्या बाबतीत दुटप्पी भूमिका आहे, अशी टीका काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली..एका बाजूला ५ हजारांच्या अग्रिम मदतीचा गाजावाजा करायचा आणि दुसरीकडे नमो शेतकरी महासन्मान निधीचे दोन हप्ते थकवून शेतकऱ्यांचे हजारो कोटी रुपये रोखून धरायचे, ही सरकारची दुटप्पी भूमिका आहे. नवव्या आणि दहाव्या हप्त्यापोटी शेतकऱ्यांना मिळणारे ३,७०० कोटी रुपये अद्याप प्रलंबित असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. .Farmer Relief Demand: शेतकऱ्यांना तुटपुंज्या मदतीची खैरात नको, हेक्टरी १ लाख रुपये सरसकट मदत द्या, हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी.नवव्या आणि दहाव्या या दोन हप्त्यांपोटी सरकारने ३,७०० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करायला हवेत. एकीकडे शेतकऱ्याला अग्रिम मदत देण्याची घोषणा करायची आणि दुसरीकडे शेतकरी महासन्मान निधी बंद करुन टाकायचा? असे सरकार महाराष्ट्राने कधीही पाहिलेले नाहीत, असेही त्यांनी म्हटले आहे. .Drought Relief: ५ हजारांची मदत म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टा, नमो शेतकरी योजनेचे पैसे का देत नाही? शेतकरी नेत्यांचा सवाल .'संपूर्ण गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा'मुख्यमंत्री पालकमंत्री असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील १० तालुके दुष्काळाच्या यादीतून वगळले गेले आहेत. आदिवासीबहुल जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आक्रोश सरकारला ऐकू येत नाही का? संपूर्ण गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना तातडीने दिलासा द्यावा, अशी मागणी करणारे पत्र मी यापूर्वीच दिले आहे. यापुढेही हा मुद्दा ठामपणे लावून धरणार आहोत. मुख्यमंत्र्यांनी या जिल्ह्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली..शेतकऱ्यांच्या गंभीर परिस्थितीची जाणीव सरकारला नाही का? शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू सरकारला दिसत नाहीत का? आम्ही बाधित शेतकऱ्यांच्या हक्काचा एक रुपयाही बुडू देणार नाही, असा इशारा त्यांनी याआधी दिला होता. राज्यातील शेतकरी पुढचे वर्ष कसे जगायचं? या चिंतेत आहे. कर्ज काढून शेती केली, सावकारी आणि खासगी कर्जाचा डोंगर उभा राहिला. पण घरात धान्याचा एक दाणाही आला नाही. अशा परिस्थितीत सरकारची ५ हजारांची मदत शेतकऱ्यांच्या कोणत्या अडचणी सोडवणार? असा सवाल त्यांनी केला आहे..शेतकऱ्यांना भरीव मदत करण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत, पण कुंभमेळा आणि शक्तिपीठ महामार्गासाठी सव्वा लाख कोटींच्या खर्चाचे नियोजन सुरू आहे. अनावश्यक खर्च थांबवा आणि शेतकऱ्यांना मदत करा, असे त्यांनी सूचित केले आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.