Farmers Crisis: शेतीविषयक धोरणांविरोधात आणि वाढत्या शेतकरी आत्महत्यांविषयी जनजागृती करण्यासाठी चिखली येथे गुरुवारी (ता. १९) एक दिवस उपवास-अन्नदात्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत नागरिक, कार्यकर्ते आणि शेतकरी पुत्र मोठ्या संख्येने सहभागी झाले होते..१९ मार्च १९८६ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील तत्कालीन सरपंच (कै.) साहेबराव करपे पाटील यांनी पत्नी मालतीताई व चार मुलांसह आत्महत्या केल्याच्या दुर्दैवी घटनेला यंदा ४० वर्षे पूर्ण होत आहेत. शेतकरी चळवळीच्या इतिहासातील हा दिवस ‘काळा दिवस’ म्हणून ओळखला जातो. शासनाच्या धोरणांमुळे हतबल होऊन घेतलेल्या या टोकाच्या निर्णयाची आठवण आजही शेतकरी वर्गाला अस्वस्थ करते. या पार्श्वभूमीवरही बळीराजाची परिस्थिती फारशी बदललेली नाही, अशी खंत या वेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली..Farmer Protest: दंडात्मक कारवाईविरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश.गेल्या दहा वर्षांपासून (कै.) डॉ. सत्येंद्र भुसारी यांनी सुरू केलेली ‘उपवासाची परंपरा’ चिखलीत सातत्याने जपली जात आहे. यावर्षीही कार्यक्रमाची सुरुवात डॉ. भुसारी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. .Farmer Protest: ‘पाणी नको, सीलिंग हटवा’चा नारा.त्यानंतर दोन मिनिटे मौन पाळून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शेकडो कार्यकर्ते, शेतकरी आणि नागरिकांनी एकत्र येत अन्नत्याग केला. या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. आंदोलनादरम्यान सरकारच्या शेतीविरोधी धोरणांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. .चुकीचे निर्यात धोरण, शेतकऱ्यांना बाजारपेठ व तंत्रज्ञानाचे अपुरे स्वातंत्र्य, शेतमालावर वारंवार लादले जाणारे निर्यात शुल्क व बंदी यामुळे शेतमालाचे भाव कोसळत असल्याचे सांगण्यात आले. देशांतर्गत उत्पादन मुबलक असतानाही परदेशातून होणारी आयात शेतकऱ्यांसाठी घातक ठरत असल्याचा आरोपही करण्यात आला. याशिवाय खते, बियाणे, मजुरी आणि इंधनाचे वाढते दर यामुळे उत्पादन खर्च प्रचंड वाढला असून, त्यानुसार हमीभाव मिळत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.