Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कर्जमाफीच्या चौथ्या यादीतील ८,४८४ शेतकरी झाले कर्जमुक्त
Debt Free Farmers : सांगली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या चौथ्या यादीतील ८ हजार ४८४ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर ५५ कोटी ४८ लाख रुपयांची रक्कम वितरित करण्यात आली आहे. आज अखेर २९४ कोटी ७३ रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यात आली आहे.