Amravati News: रब्बी हंगामातील पिकांचा विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना फार्मर आयडी (अॅग्रीस्टॅक नोंदणी) काढणे अनिवार्य करण्यात आले आहे. यंदाच्या हंगामातील गहू, हरभरा व कांद्यासाठी विमा योजना लागू करण्यात आली असून १५ डिसेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. .रब्बी हंगामास प्रारंभ होत असून यंदा जिल्ह्यात २ लाख १३ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी अपेक्षित करण्यात आली आहे. या हंगामात गहू व हरभरा ही मुख्य पिके असून मका व रब्बी ज्वारीचाही पेरा केल्या जातो. नैसर्गिक आपत्तीत होणाऱ्या नुकसानीमुळे आर्थिक संरक्षणासाठी पीकविमा योजना लागू असून शेतकऱ्यांनी १५ डिसेंबरपर्यंत गहू, हरभरा व कांदा या पिकांचा विमा काढण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. उन्हाळी भुईमुगासाठी ३१ मार्च २०२६ ही अंतिम मुदत आहे. .Rabi Crop Insurance: पीकविमा घेण्यासाठी १५ डिसेंबरची मुदत.जिल्ह्यात यंदा गव्हाखाली ५३ हजार ७४० व हरभऱ्याखाली १ लाख ४७ हजार हेक्टर क्षेत्र राहणार आहे. खरिपात नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांची अतोनात हानी झाली आहे. रब्बी हंगामात ही शक्यता नाकारता येण्यासारखी नसून नैसर्गिक आपत्तीसह कीड व रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीत पिकांचे नुकसान झाल्यास विमा संरक्षण दिल्या जाते. .पिकांच्या उत्पादनात येणाऱ्या घटीपासून या योजनेत विमा संरक्षणासह नुकसानभरपाई मिळणार आहे.विमा योजनेच्या सविस्तर माहितीसाठी मंडळ कृषी अधिकारी, सहायक कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधता येणार आहे..MahaDBT Scheme: महाडीबीटीच्या बोगस लाभार्थ्यांचे आधार आणि फार्मर आयडी ब्लॉक होणार; राज्य सरकारचा निर्णय .या योजनेत सहभागी होण्यासाठी फार्मर आयडी असणे अनिवार्य आहे. पीकविमा नुकसानभरपाईसाठी ई-पीक पाहणी अंतर्गत पीक नोंदणी बंधनकारक आहे. अॅग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक, सातबारा, आठ-अ, आधार कार्ड, बॅंक पासबुक व स्वयंघोषणापत्र शेतकऱ्यांना द्यावे लागणार आहे..अशी आहे पीकविमा योजना (प्रति हेक्टर)पीक ः विमा संरक्षित रक्कम ः शेतकरी हिस्सागहू ः ४५,००० ः ४५०हरभरा ः ३४,८०० ः ३४८रब्बी कांदा ः ७३,३०० ः १८३.२५उन्हाळी भुईमूग ः ४०,६०० ः १०१.५०.सीएससी केंद्रामार्फत अर्ज करताना निर्धारित शेतकरी हिस्स्यापेक्षा अधिक रक्कम घेतली जात असल्यास तत्काळ नजीकच्या तहसील व कृषी कार्यालयास तक्रार करावी. अखेरच्या दिवसांत पोर्टलवर लोड येण्याची शक्यता असल्याने अंतिम मुदतीची वाट न बघता शक्य तितक्या लवकर सीएससी केंद्राशी संपर्क साधून नोंदणी करावी. - राहुल सातपुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.