Nashik News: सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी चिंचोली फाटा ते पांढुर्लीदरम्यान बांधण्यात येत असलेल्या कुंभमेळा राज्यमार्ग क्रमांक ३७ चे काम शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला न देताच सुरू करण्यात आले आहे. यास सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळा व चिंचोली येथील ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे. त्या अनुषंगाने मागील ६ दिवसांपासून चिंचोली येथे त्यांचे साखळी उपोषण सुरू आहे. .शासन स्तरावर लवकरात लवकर ठोस निर्णय न झाल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करू, अशी भूमिका आंदोलक शेतकऱ्यांनी घेतली आहे. या घडामोडींसंदर्भात माहिती देताना संबंधित शेतकरी म्हणाले की, शेतकऱ्यांमध्ये सरकारच्या भूमिकेविषयी असंतोष आहे..Land Acquisition Compensation: मोबदल्याशिवाय आम्ही जमीन देणार नाही.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आमच्याशी चर्चा केली. तुमचा प्रस्ताव पाठविण्यात येईल, असे आश्वासन त्यांच्याकडून देण्यात आले. मात्र भूसंपादन व जमीन मोबदल्यासंदर्भात जोपर्यंत शासन ठोस निर्णय घेत नाही, लेखी उत्तर मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार आहोत..Crop Compensation GR : तमिळनाडू सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा.यापूर्वी खासदार राजाभाऊ वाजे, सिन्नरचे नगराध्यक्ष विठ्ठल उगले, पंचायत समितीचे माजी उपसभापती संग्राम कातकाडे, नाशिक साखर कारखान्याचे माजी चेअरमन तानाजी गायधनी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक तालुकाध्यक्ष संतोष गायधनी, तसेच जयंत आव्हाड यांनी उपोषणस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली..राज्यमार्गासाठी जमिनी संपादित होणाऱ्या शेतकऱ्यांना तिचा योग्य मोबदला मिळालाच पाहिजे, यासाठी शासन दरबारी आवाज उठवण्याचे आश्वासन पदाधिकाऱ्यांनी दिले. या साखळी उपोषण आंदोलनात ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत..तसेच, ग्रामस्थांच्या वतीने शासकीय यंत्रणांना मागण्यांवर कार्यवाही करण्याची नोटीस देण्यात आली आहे. तिला ठोस उत्तर न मिळाल्यास कायदेशीर लढाई तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.