Agriculture Competitions for Farmers: ‘‘शेतकऱ्यांसाठी ‘फार्मर कप’ ही स्पर्धा उत्पन्नवाढीची मोठी संधी ठरत असून, गटशेतीच्या माध्यमातून थेट लाखोंची बक्षिसे जिंकण्याची संधी उपलब्ध झाली आहे. शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येत या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,’’ असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे..कवठे येमाई येथील सहायक कृषी अधिकारी नंदू जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘फार्मर कप’ ही स्पर्धा शेतकरी गटांना प्रोत्साहन देणारी अनोखी संकल्पना आहे. राज्यस्तरावर प्रथम क्रमांकासाठी ५० लाख, द्वितीयसाठी ३० लाख आणि तृतीयसाठी २० लाख रुपयांची आकर्षक बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, महिला गटांसाठी स्वतंत्र प्रोत्साहन देण्यात आले असून राज्यातील पहिल्या तीन महिला गटांना प्रत्येकी १० लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे..Cooking Competition: पारंपरिक पौष्टिक धान्यांच्या विविध पदार्थांना मिळाले स्वादिष्ट रूप.राज्यस्तरावर क्रमांक न मिळाल्यास जिल्हास्तरावर शेतकऱ्यांना संधी मिळणार आहे. जिल्ह्यात प्रथम क्रमांकासाठी ५ लाख, द्वितीयसाठी ३ लाख आणि तृतीयसाठी २ लाख रुपये बक्षीस दिले जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक गावातून अधिकाधिक शेतकरी गटांनी सहभाग नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे..Farmer Cup 2026: दौंडमध्ये ‘फार्मर कप’ची लगबग.या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी किमान ११ कुटुंबांचा गट तयार करणे आवश्यक असून, गटाने एकत्रित किमान १५ एकर क्षेत्रावर एकाच पिकाची लागवड करणे अपेक्षित आहे. गट बांधणीसाठी ‘पाणी फाउंडेशन’च्या प्रशिक्षित निमंत्रकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. शेतकऱ्यांना स्पर्धेबाबत सविस्तर मार्गदर्शन मिळावे, यासाठी दर सोमवार ते शुक्रवार सकाळी १० वाजता व सायंकाळी ६ वाजता ऑनलाइन झूम मीटिंगचे आयोजन करण्यात आले आहे..‘फार्मर कप’ची वैशिष्ट्येराज्यस्तरावर ५०, ३०, २० लाखांची बक्षिसेमहिला गटांसाठी स्वतंत्र १० लाखांचे पारितोषिकजिल्हास्तरावरही ५, ३, २ लाखांची संधीगटशेतीला प्रोत्साहन देणारी स्पर्धाऑनलाइन मार्गदर्शन सुविधा.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.