Water Foundation: पाणी फाउंडेशन आयोजित ‘फार्मर कप २०२६’ स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्यात गटशेतीला चालना देण्यासाठी विविध उपक्रमांना वेग आला आहे. राळेगण सिद्धी येथे नुकत्याच पार पडलेल्या तीन दिवसीय प्रशिक्षणानंतर आता तालुकास्तरीय तसेच विभागनिहाय गटशेती नियोजन बैठका आयोजित करण्यात येत आहेत. या उपक्रमात कृषी विभाग अग्रेसर असून ‘आत्मा’च्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन व नियोजन सत्रे घेतली जात आहेत..दौंड येथे पाणी फाउंडेशनचे मुख्य मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ यांनी शेतकऱ्यांना गटशेतीविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. या वेळी एकत्रित खरेदीद्वारे खर्च कमी करणे, यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून शेती कामे सुलभ करणे तसेच स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रॅक्टिसेसचा अवलंब करून उत्पादन वाढवणे या गटशेतीच्या महत्त्वाच्या घटकांवर त्यांनी विशेष भर दिला. खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये पाणी फाउंडेशन व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने फार्मर कप स्पर्धा राबविण्यात येणार असल्याची माहिती या वेळी देण्यात आली..Farmer Cup 2026: फार्मर कपसाठी कृषी विभाग सज्ज : कळसाईत .डॉ. पोळ यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, शेतकऱ्यांनी गट तयार करून सामूहिक पद्धतीने शेती केल्यास उत्पादन खर्च कमी होतो, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुलभ होतो आणि बाजारपेठेत पिकांना चांगला दर मिळण्यास मदत होते..तसेच पाणी व्यवस्थापन, पीक नियोजन, एकत्रित मशागत आणि उत्पादनाचे सामूहिक विपणन या बाबतही त्यांनी सविस्तर माहिती दिली. या मार्गदर्शनामुळे गटशेतीची संकल्पना अधिक स्पष्ट झाली असून भविष्यात एकत्रित शेती करण्याचा संकल्प शेतकऱ्यांनी व्यक्त केला..Farmer Cup Training: अकोल्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत फार्मर कपचे प्रशिक्षण.कार्यक्रमाला गटविकास अधिकारी अरुण मरभळ, तालुका कृषी अधिकारी अजिंक्य दुधाने, पंचायत समितीचे कृषी अधिकारी रमेश भद्रोड, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक परमेश्वर सुतार, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक महेश रूपनवर, सहायक कृषी अधिकारी अंगद शिंदे, संदीप सरक तसेच पाणी फाउंडेशनचे समन्वयक मयूर साळुंके..कृषिभूषण वसुधा सरदार, माजी जिल्हा परिषद सदस्य यशवंत खताळ, तुषार हाके, अभिजित बारवकर यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमात पाणी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक सुखदेव भोसले यांनी आभार मानले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.