Nagpur News : शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण देण्यासाठी सरकारने सुरू केलेली एक रुपयात पीकविमा योजना बंद केली. याचा फटका शेतकऱ्यांना बसला असून गतवर्षीच्या तुलनेत पीकविमा योजनेत सहभागी शेतकऱ्यांची संख्या निम्म्यावर आली असून जिल्ह्यात केवळ ७३ हजार शेतकऱ्यांनी पिकांना विम्याचे कवच दिले आहे. .यंदा शासनाने खरीप आणि रब्बी हंगामासाठी सुधारित पंतप्रधान पीकविमा योजना लागू केली. २०२५-२६ या १ वर्षाकरिता अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी विमा क्षेत्र घटक धरून राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला. नागपूर जिल्ह्यात भारतीय कृषी विमा कंपनी या विमा कंपनीची निवड करण्यात आली. खरीप पिकांचा विमा काढण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया १ जुलैपासून सुरू करण्यात आली होती..Fruit Crop Insurance : फळपीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे.अर्ज करण्याची मुदत ३१ जुलैला संपली. परंतु गतवर्षीच्या तुलनेत कमी सहभाग, शेतकऱ्यांकडे अग्रिस्टॅक आयडी नसणे, पीएमएफबीवाय पोर्टल सेवेतील व्यत्यय, आधार, सर्व्हरवरील व्यत्यय, राज्याच्या भूमीअभिलेख पोर्टलच्या तांत्रिक सेवेतील व्यत्यय इत्यादीमुळे योजनेतील सहभागावर होणारा परिणाम लक्षात घेत केंद्र शासनाने केंद्र शासनाने बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी १४ ऑगस्ट, कर्जदार शेतकऱ्यांना ३० ऑगस्ट, २०२५ पर्यंत विशेष बाब म्हणून मुदतवाढ दिली होती. परंतु मुदतवाढ देऊनही शेतकऱ्यांनी विमा काढण्यात रस दाखविलेला नाही. १२ हजार ४३ कर्जदार शेतकऱ्यांनी, तर ६१ हजार ३२९ बिगर कर्जदार अशा ७३ हजार ३७२ शेतकऱ्यांनी ७३ हजार ६३२ हेक्टरवरील पिकांना विम्याचे कवच दिले आहे..Orange Crop Insurance : विमा भरपाई दिरंगाईला कृषी विभाग, कंपन्यांचे धोरण कारणीभूत.भरपाई निकषात बदलगतवर्षी पीकविमा भरपाई ही बीड पॅटर्न पद्धतीने देण्यात आली. यंदा यात बदल केले आहे. पीक पेरणीपासून काढणी पर्यंतच्या कालावधीत विविध नैसर्गिक आपत्ती किंवा पीक उत्पादनावर विपरीत परिणाम करणाऱ्या इतर बाबीमुळे हंगामाच्या शेवटी, पीक कापणी प्रयोग, तांत्रिक उत्पादन, महसूल मंडळामध्ये पिकाच्या उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत येणारी घट गृहीत धरून नुकसान भरपाई देण्यात येणार आहे..गतवर्षी ६१.२९ कोटीची दिली भरपाईगतवर्षी नागपूर जिल्ह्यात लाख ६८ हजार ८४० शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढत तीन लाख २,४१२ हेक्टर क्षेत्रातील पिकांना विम्याचे कवच दिले होते. यात सोयाबीन, कापूस, भात, तूर, मूग, उडीद, भुईमूग, ज्वारी या पिकांचा समावेश होता. गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीने तसेच पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून ६१ कोटी २९ लाख रुपयाचे नुकसान भरपाई देण्यात आली होती. यात ४१ हजार २९८ शेतकऱ्यांना ही भरपाई मिळाली होती..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.