Nanded News: गोदावरी नदीकाठी असलेल्या दोन एकर शेतीतील सोयाबीन पाण्यात बुडून गेल्यामुळे व्यथित झालेल्या शेतकऱ्याने विजेच्या तारेला पकडून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (ता. २६) नांदेड तालुक्यातील वाहेगाव येथे घडली..नांदेड जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून प्रचंड पाऊस होत आहे. यामुळे अनेक नदी-नाल्यांना पूर येत आहे. नांदेड शहराजवळ असलेल्या वाहेगाव येथील पंडित वामनराव सोनटक्के (वय ५९) यांचे गोदावरी नदी काठी दोन दोन एकर सोयाबीन नदीच्या प्रवाहामुळे पाण्यात बुडून पूर्ण खराब झाले..Farmer Death: सगंळ पैसं शेतात गेलं अन् पीक पाण्यात.आधीच दारिद्र्य असलेल्या शेतकरी शेतातील पीक पुरामुळे वाया गेल्यामुळे घरी येऊन हताश झाला. दोन मुलींचे लग्न कसे करावे या विवंचनेत असलेल्या शेतकऱ्याने व्यथित होऊन गुरुवारी शेतातून घरी आला. यानंतर त्यांनी घरावर असलेल्या विद्युत तारेला स्पर्श केला. यात त्यांचा मृत्यू झाला..Farmer Death Investigation: आधी चौकशी, मग गुन्हे दाखल होणार !.मृत शेतकरी पंडित सोनटक्के यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली आहेत. यातील एका मुलीचे लग्न झाले आहे. तर दोन मुली अविवाहित असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांकडून मिळाली. या प्रकरणी नांदेड ग्रुप ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे पूरस्थिती उद्भवून शेती पिकांचे नांदेड जिल्ह्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे..या बाबत शेतकऱ्यांसह अनेकांनी शासनाने भरीव मदत करण्याची मागणी केली. परंतु शासन स्तरावर अद्याप निर्णय झाला नसल्याने शेतकरी टोकाची भूमिका घेत आहेत. या बाबत शासनाने त्वरित शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.