Jalna News : ग्रामीण भागातील ग्रामीण रस्ते, हद्दीचे ग्रामीण रस्ते, ग्रामीण गाडीमार्ग, पायमार्ग, शेतावर जाण्याचे पायमार्ग, गाडीमार्ग या रस्त्यांचे सीमांकन करणे व त्यांना विशिष्ट क्रमांक देण्याची कार्यपद्धती शासन निर्णयानुसार ठरविण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतरस्त्यांना आता सीमांकनासह विशिष्ट क्रमांक दिला जाणार, असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी दिली..शेतकऱ्यांसाठी शेतामध्ये पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी आदि कामांसाठी तसेच शेतीमाल बाजारात पोहचविण्यासाठी बारमाही शेतरस्ते असणे अत्यंत आवश्यक आहेत. त्यामुळे प्रत्येक गावातील ग्रामसेवक, ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), महसूल सेवक (कोतवाल) आणि गावचा पोलिस पाटील यांच्या मदतीने शेत रस्त्याचे नाव, तपशिलासह नमुद रस्त्यांची यादी तयार करतील. .Farm Road: राज्यात पाच वर्षांत पक्के शेतरस्ते.यासाठी प्रत्येक गावात सज्जामध्ये स्थानिक नागरिकांसह शिवार फेरी आयोजित करण्यात येईल. या यादीमध्ये गाव नकाशावर नोंद असलेले वापरातील तसेच अतिक्रमण झालेल्या सर्व रस्त्यांची नोंद प्रपत्र क्र.१ मध्ये घेण्यात येईल. वापरात असलेले परंतु गाव नकाशावर नाहीत अशा रस्त्यांचा तपशिल यादीमध्ये प्रपत्र क्र.२ मध्ये समावेश करण्यात येणार आहे. .गावनिहाय तयार करण्यात आलेल्या रस्त्यांची प्राथमिक यादी ग्रामसभेमध्ये सर्व ग्रामस्थांच्या माहितीसाठी ठेवण्यात येईल. ग्रामसभेच्या मान्यतेनंतर अंतिम झालेली यादी ग्रामसभेच्या ठरावासह तहसीलदार यांच्याकडे सादर करण्यात येईल. यावेळी रस्त्यांची मोजणी व सीमांकनासाठी आवश्यक असलेले शुल्क भूमि अभिलेख विभागाकडून आकारले जाणार नाही.तसेच सीमांकन केलेल्या रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावण्याबाबत यापूर्वीच्या सूचनांप्रमाणे कार्यवाही करण्यात येणार आहे..Farm Road : शेतरस्त्याला स्वतंत्र क्रमांक अन् गाव नमुन्यात रेकॉर्डही.अतिक्रमित रस्ते निष्कासित करतांना मामलेदार न्यायालय अधिनियम, १९०६ चे कलम ५ अन्वये अतिक्रमण प्रस्तावामध्ये संबंधितांना सुनावणीची नोटीस देण्यात येईल. सुनावणीची नोटीस बजावणी केल्यानंतर संबंधित पक्षकारांची मंडळ अधिकारी यांच्याकडून सुनावणी घेण्यात येईल. .तालुकास्तरीय समितीमध्ये उपविभागीय अधिकारी अध्यक्ष, गटविकास अधिकारी व तालुका अधिक्षक भूमी अभिलेख आणि पोलिस निरीक्षक हे सदस्य असतील तर तहसीलदार हे सदस्य सचिव असणार आहेत. ज्या ठिकाणी रस्ते अतिक्रमण केले आहे, अशा ठिकाणी शेतकऱ्यांची बैठक घेऊन शेतकऱ्यांना समजावून सांगण्यात येईल, असेही प्रशासनाने कळविले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.